Home / महाराष्ट्र / सर्वसामान्यांच्या...

महाराष्ट्र

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी संघर्षाची तयारी ठेवा -सुधिर मुनगंटीवार

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी संघर्षाची तयारी ठेवा  -सुधिर मुनगंटीवार

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी संघर्षाची तयारी ठेवा -सुधिर मुनगंटीवार

मुंबई,ता.९: 'सेवा, संघटन, संवाद, संघर्ष आणि विकास या पंचसूत्री नुसार भारतीय जनता पार्टीची पायाभरणी झाली असून कार्यकर्त्यांनी याचा अवलंब केल्यास राष्ट्रहिताचे आमचे ध्येय निश्चित साध्य होईल. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वात त्या दिशेने वाटचाल देखील सुरू झाली आहे,  असे प्रतिपादन  करून सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी संघर्षाची तयारी ठेवा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित औसा विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यावेळी मंचावर उपस्थित होते.

सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले की भारतीय जनता पार्टी चा इतिहास त्याग, बलिदान आणि समर्पणाचा आहे. राष्ट्र सर्वोतोपरी हे ध्येय निश्चित करून सत्ता कारणासाठी राजकारण न करता समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकासाचा मार्ग खुला करण्याचे ध्येय भारतीय जनता पार्टीच्या मुशीत घडलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आहे. देशात अडीच हजाराहून अधिक पक्ष आहेत परंतु यामध्ये भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे जो नेता आणि परिवार यापेक्षा संघटन आणि कार्यकर्ता यांच्या बळावर मोठा झालाय. यातला प्रत्येक कार्यकर्ता निष्ठेने आणि सेवाव्रती भावनेने झपाटल्यागत काम करतो. विशेष म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानव वाद या संकल्पनेतून शेवटच्या माणसाचे कल्याण या उद्दिष्टाने काम करणारा भाजपाचा कार्यकर्ता केवळ निवडणूक नाही तर जनतेची मने जिंकण्याचा प्रयत्न करतो, म्हणूनच विश्व गौरव नरेंद्र मोदी यांच्यासारखा भाजपाचा नेता जगात सर्वात लोकप्रिय झाला आहे.

अनेक आव्हाने सध्या देशासमोर आहेत, समाजासमोर आहेत. त्यावर मात करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशिवाय पर्याय नाही असा विश्वास देशातील जनतेला झाला आहे. म्हणूनच आपली ही जबाबदारी अधिक वाढली आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी असे आवाहन देखील त्यांनी केले. केंद्र शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून हक्काच्या मागण्यांसाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे आवाहन देखील सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...