Home / महाराष्ट्र / बळीराजाच्या तडाख्यात...

महाराष्ट्र

बळीराजाच्या तडाख्यात बटू वामनाची पिलं

बळीराजाच्या तडाख्यात बटू वामनाची पिलं

ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष - लोकजागर



(भारतीय वार्ता):  बळीराजाला पाताळात गाडणारे कपटी कायदे त्वरित रद्द करा, ह्या मागणीसाठी पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी पुकारलेला लढा ऐतिहासिक आहे, देशव्यापी आहे.  खऱ्या अर्थानं ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांसोबत सारा देश उभा होतांना दिसत आहे. 

शेतकऱ्याचा नांगर संघ, मोदी आणि शहा यांच्या नको तिथं जाऊन घुसला आहे. बाहेरही काढता येत नाही, आतही घेता येत नाही, अशी या लोकांची अवस्था झाली आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येचं पाप संघाच्या माथ्यावरून मिटू शकत नाही. स्वातंत्र्याला विरोध, इंग्रजांची दलाली, सावरकरांचं पेंशन आदी अनेक पापांचा इतिहास आता काही केलं तरी बदलता येणार नाही. पण तरीही संघ शहाणा होतांना दिसत नाही. उलट मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले कायदे करून त्यांनी आपल्या कपटी वृत्तीचा पुरावाच सादर केला आहे. हे बटू वामनाचं नवं षडयंत्र आहे. पुन्हा एकदा बळीराजाला मातीत घालण्याचा डाव आहे.

सैतानाला स्वतःचा चेहरा नसतो. म्हणून त्याची सरळ शिकार करता येत नाही. २०१४ पासून मात्र हजारो वर्षांच्या विकृतिला हक्काचा सेनापती मिळाला. सैतानाला चेहरा मिळाला. धृतराष्ट्र केवळ आंधळा नव्हता, तर मूर्खही होता, विकृतही होता. मग्रूर दुर्योधन, दुःशासन हे त्याच्या विकृतीचे वारसदार होते. द्रौपदीचं राजरोस वस्त्रहरण हा अख्ख्या कौरव परिवाराच्या आनंदाचा सांघिक जल्लोष होता. सत्तेच्या उन्मादात आणि पांडवांच्या नादारी मुळे कौरव जास्तच चेकाळले होते. अंबानी, अदानी, रामदेव हे नवे भस्मासूर कौरव सेनेच्या मदतीला जाऊन उभे राहिल्यामुळे  सैतानाचा डिजे आणखीच जोरात वाजायला लागला.

पांडवांच्याही चुका झाल्यात. बळीराजाची मुलंही बेसावध राहिली, याबद्दल संशय नाही. त्याची किंमत त्यांना तेव्हाही मोजावी लागली, आताही मोजावी लागत आहे. 

एखाद दुसरा माणूस माजला तर त्याला पायबंद घातला जाऊ शकतो. पण अख्खा परिवारच माजला असेल तर ? याचा अर्थ त्या परिवाराचा विनाशकाळ जवळ आला आहे, असाच होतो. विकृतीची मुळं कितीही खोलवर रूजत असली, तरी फळांचं आयुष्य फार दीर्घ असत नाही. २०१४ नंतर तर विकृतीचा अक्राविक्राळ नाच आपण पहात आहोत !

हिंदू धर्माच्या नावावर ओबीसी, बहुजन, आदिवासी, मागासवर्गीय लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा हजारो वर्षांपासून या देशात सुरू आहे. जशी मोदी यांची 'सबका साथ, सबका विकास'ची नौटंकी तशीच हिंदू धर्माच्या नावावर वर्णवादी लोकांची चालबाजी सुरू असते. मंदिर - मशिदीच्या नावानं आंदोलन, दंगे, मारपीट करण्यासाठी, जेलमध्ये जाण्यासाठी बहुजन समाज संघाला हवा हवासा वाटतो, तोच समाज राममंदिर ट्रस्ट मध्ये घेतांना मात्र अस्पृश्य होत असतो. १५ पैकी १४ ट्रस्टी मात्र त्यांना उच्चवर्णीय हवे असतात. तिथं ओबीसी, आदिवासी मधील कुणीही चालत नसतो. अल्पसंख्यांक समाजाचा द्वेष करण्यासाठी त्यांना ओबीसी, शेतकरी, आदिवासी, काही मागासवर्गीय समाज देखील हिंदू म्हणून प्रिय असतात. करोडो देव पाठीशी असूनही सोयीनुसार त्यांचा 'धर्म धोक्यात' येत असतो. त्याला वाचवण्यासाठी देखील ओबीसी, बहुजनांची मुलंच हवी असतात. मात्र शेतकरी रोज आत्महत्या करतो, तेव्हा यांचा धर्म कधीही धोक्यात येत नाही. कारण त्यावेळी शेतकरी हा त्यांच्यासाठी हिंदू नसतोच. तो मागासवर्गीय असतो. कुणबी असतो, तेली असतो, माळी असतो, धनगर असतो किंवा आणखीही कुणी असतो. त्याचा उपयोग संघ, भाजपसाठी पायपुसण्या एवढाच असतो.

२०१४ पासून देशात महाभारत - २ चा धिंगाणा सुरू झाला. ज्युनियर धृतराष्ट्र आणि ज्युनियर दुर्योधन - दुःशासन या देशाच्या मानगुटीवर बसलेत. नोटाबंदी सारखा बिनडोक निर्णय वेडाचा झटका यावा तसा घेण्यात आला. द ग्रेट अमित शहा यांच्या मुलाची प्रॉपर्टी रातोरात वाढली. शेकडो लोक बँकेसमोर लाईनमध्ये मेले. पण ना भाजपाला लाज वाटली, ना संघाला लाज वाटली, ना पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीला लाज वाटली.

निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा हमला झाला. या अतिरेकी हमल्यातली गाडी कुठून आली, एवढं आरडीएक्स कुठून आलं, त्या चौकशीचं घोडं कुठं अडलं, काही पता नाही. मात्र शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झाल्याबरोबर त्यात पाकिस्तानचा हात आहे, चीनचा हात आहे, नक्षलवादी घुसले आहेत, याची माहिती सरकार मधील लोकांना ताबडतोब मिळून जाते. लगेच हे लोक वाटेल तसे आरोप करून मोकळे होतात. मंत्रिपदावर असलेली माणसं एवढी टपोरी वागण्याचा पराक्रम या सरकारनं पुन्हा पुन्हा केला आहे. जेएनयू मधील हमले, पाकिस्तान जिंदाबादचे नारे, बुरखा घालून आंदोलनात घुसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या महिला, हे सारे प्रकार या देशाला अलीकडे राजरोस पाहायला मिळाले.

हा सोशल मिडीयाचा जमाना आहे. एका क्लिकवर जगातली सारी माहिती उपलब्ध आहे. तरीही भाजपाच्या नेत्यांना खोटं बोलताना काहीही वाटत नाही. त्यांचे प्रवक्ते तर निर्लज्जपणे धडधडीत खोटं बोलतात. इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांचा गुलामच आहे. खुनी, तडीपार, बलात्कारी, आतंकवादी असणारे लोक हेच सत्ताधारी पक्षाचे आधारस्तंभ आहेत. नेते आहेत. भारतीय राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर आणण्याचं सारं श्रेय अर्थातच भाजपा आणि संघाकडे जाते. तरीही लोक त्यांना निवडून देतात हे बघून त्यांचीही हिम्मत वाढत गेली. 
 
दुसऱ्यांदा सत्ता मिळताच या लोकांनी सारा देश विकायला काढला. लोकशाही मोडीत काढली. भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि आता ते शेतकऱ्यांना बर्बाद करायला निघाले आहेत. कॉन्ट्रॅक्ट फार्मींग, भंडारण कायदा आणि जीवनावश्यक वस्तू कायदा या कायद्याच्या आडून भारतीय शेती कार्पोरेट घराण्यांच्या घशात घालण्याचा अत्यंत घृणास्पद डाव मोदी सरकार खेळत आहे. संघाचे स्वदेशी बहाद्दर सुरुवातीला विरोध करण्याचं नाटक करून गेले. पण आंदोलन जसं जसं तीव्र व्हायला लागलं आणि त्यात फूट पाडणं किंवा हायजॅक करणं शक्य नाही, असं त्यांच्या लक्षात आलं, त्याच क्षणी त्यांनी गुपचूप पलटी मारली आणि आपलं असली रूप दाखवून दिलं. 

इतर आंदोलनं जशी चिरडली, तसंच शेतकरी आंदोलन चिरडून टाकता येईल, अशी मस्ती सरकारच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ४० पेक्षा जास्त भूमिपुत्र शहीद झाले असताना, जराशीही खंत वाटू नये, ही खरंच मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट नाही का ? संघ धर्माच्या गोष्टी करतो, संस्कृतीच्या गोष्टी करतो, पण अशावेळी नेमका मुग गिळून बसतो. ही कोणती संस्कृती असेल ? पिढ्यान् पिढ्या देशासाठी शहीद होण्याचा ज्यांचा इतिहास आहे, अशा समूहांनाही हे लोक देशद्रोही म्हणायला मागेपुढे पहात नाहीत, यावरूनच यांचा माज सहज लक्षात येतो.

पण त्यांच्या दुर्दैवानं यावेळची लढाई वेगळी आहे. जाती धर्माच्या नावावर बदनाम करण्याचा, फूट पाडण्याचा खानदानी धंदा यांनी इथेही करून पाहिला. पण यावेळी त्यांनी स्वतःचीच सूजवून घेतली. त्यांच्या दुर्दैवानं देशातील शेतकरी एक झाला. आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. बटू वामनची पिलं आता आयतीच बळीराजाच्या तडाख्यात सापडली आहेत. भाजपाच्या आमदाराचा पाठलाग करू करू लोकांनी आपला राग काढला. वाट मिळेल तिकडे त्यांना आपल्या गाड्या पळवाव्या लागल्या. डाकूंच्या टोळीचा करावा, तसा पाठलाग गावातील शेतकऱ्यांनी भाजपा आमदाराच्या टोळीचा केला. हरयाणा मध्ये मुख्यमंत्री खट्टर यांना सभा सोडून पळून जावं लागलं. त्यांचाही ताफा वाट फुटेल तिकडे पळतांना दिसला. लोक काळे झेंडे घेवून त्यांच्या गाडीचा पाठलाग करताना दिसले. उत्तराखंड मध्ये तर पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स संतप्त शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरनं चिरडून टाकले. पोलिस काहीही करू शकले नाहीत. शेवटी पोलिसही शेतकऱ्याचीच मुलं आहेत ना ? मोदी सरकारच्या नीचपणा बद्दलचा राग त्यांच्याही मनात असणार नाही का ?

ज्यांची मुलं देशाच्या रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात सैन्यात सामील आहेत, पिढ्यान् पिढ्या बलिदान दिलेलं आहे आणि जे आजही अत्यंत संयमानं आंदोलन करत आहेत, त्याच शेतकऱ्यांना मानसिक रुग्ण असलेले भाजपाचे मंत्री खलिस्तानी, आतंकवादी, पाकिस्तानी, चिनी, नक्सली म्हणून बदनाम करत असतील, तर पंजाब हरियाणाच्या बहुसंख्य पोलिसांना खरंच आनंद होत असेल का ? ते शेतकऱ्यांना ओळखत नाहीत का ? हायवे वर खंदक खोदणे, कडाक्याच्या थंडीत गार पाण्याचा मारा करणे हे अमानूष आहे, असं त्यांना वाटत नसेल का ? त्यांच्या डोळ्यादेखत ४० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा जीव या सरकारच्या मग्रुरीमुळे गेला, याचं त्यांना काहीच दुःख नसेल का ?

महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचे कैवारी असण्याचा बहाणा करणाऱ्या काही विषारी शेपट्या हल्ली शेतकरी आंदोलनाच्या विरोधात नव्या जोमानं वळवळ करतांना दिसतात. सरकारची वकिली करताना दिसतात. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याच्या कामी जीव तोडून लागलेल्या दिसतात.

पण असंतोषाचा वणवा देशभर पसरला आहे. अंबानी, अदानी, रामदेव या लुटारू कॉर्पोरेट्सवर लोक बहिष्कार घालत आहेत. जागतिक श्रीमंतीत ४ थ्या नंबरवर असलेले अंबानी ११ व्या नंबर वर फेकले गेले आहेत. त्यांचे शेअर्स १६ टक्क्यांनी घसरले आहेत. अंबानींच्या सुमारे १४०० टॉवर्सचा वीज पुरवठा शेतकऱ्यांनी तोडला असल्याच्या बातम्या आहेत. बळीराजाचा नांगर आणखी खोलवर घुसतो आहे. म्हणूनच कन्हत कुथत का होईना, मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या समोर शेपटी टाकल्याशिवाय आता पर्याय राहिला नाही. किरकोळ का असेना, पण चार पैकी दोन निर्णय मागे घेण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. मुख्य दोन मागण्यांबाबत पुढे आणखी चर्चा होऊ घातली आहे.

मात्र आताच हूरळून जाता येणार नाही. हा साप दुतोंडीही आहे आणि विषारी देखील. हा अख्खा परिवारच सैतानी वृत्तीचा आहे. केव्हा, कशी बेइमानी करतील याचा नेम नाही. पण यावेळी यांची गाठ बळीराजा सोबत आहे. गाय - गोमुत्रावर जगणाऱ्या लोकांनी उगाच खाजवण्या पेक्षा वेळीच शहाणं होणं हे त्यांच्याच फायद्याचं आहे. आणि तरीही यांचा माज उतरला नाही तर, पुढील परिणाम अनिवार्य आहेत..
• अंबानी आणखी मातीत जातील.
• अदानी, रामदेव यांच्या साम्राज्याला देखील हादरे बसतील.
• हरियाणा मधील सरकार धोक्यात येईल.
• बिहारमधील सरकार बदलेल. नवं समीकरण अस्तित्वात येईल.
• भाजपाच्या आमदार, खासदार, मंत्री, नेते यांच्या विरोधात आक्रोश वाढत जाईल. लोक पाठलाग करून करून त्यांना घेरतील.
• केंद्रातील सरकारला देखील धोका निर्माण होऊ शकेल. 
• ज्या गतीनं ह्यांचा उन्माद वाढला त्यापेक्षा चौपट गतीनं बटू वामनाचा परिवार मातीत जाणार, एवढं मात्र नक्की. 

मात्र बळीराजाच्या मुलांनी डोळ्यात तेल घालून सावध राहायला हवं. पुन्हा पुन्हा विश्वासघात होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे ! त्यांच्या कळपात सामील झालेले आपल्यातले फितूर ओळखले पाहिजे. त्यांच्याशी नातं तोडलं पाहीजे.

आम्ही भोळे सांब राहिलो
त्यांनी लुटली गावे
बळीराजाचे राज्य गड्यांनो
पुन्हा नव्याने यावे
दिल्लीचाही सात-बारा 
हवा तुला अन् मला रे..
बळीराजाच्या मुला
भीष्म, कर्ण अन् पांडव सारे
एक होऊ या, चला रे..
बळीराजाच्या मुला !

२०२० हे वर्ष सर्वांसाठीच भीतीदायक होतं. किळसवाणं होतं. दलालांचं होतं. २०२१ हे  वर्ष मानवमुक्तीचं असावं. या निमित्तानं बळीराजाच्या साम्राज्याची पुनर्स्थापना होवो आणि शेतकरी आंदोलन हीच त्याची मुहूर्तमेढ ठरो, हीच अपेक्षा !  
 

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...