वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
भारतीय-वार्ता: यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांनी केलेल्या कारवाईत यवतमाळ येथील लोहारा पोलिस ठाण्याच्या एका सहायक पोलिस निरीक्षकास सात लाखांच्या लाच प्रकरणात रंगेहात ताब्यात घेण्यात आले. तसेच या लाच प्रकरणात त्याला सहकार्य करणार्या इतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगळवार, 7 डिसेंबर रोजी करण्यात आली.
अनिल घुगे (वय 52) असे त्या सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव असून विद्युत वसानी व विशाल माकडे अशी इतर दोन आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराविरोधात लोहारा पोलिस ठाण्यात एका प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. येथे कार्यरत अनिल घुगे याने तक्रारदारास जमानत होईल अशी मदत करण्यासाठी 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती अनिल घुगे याने 7 लाख रुपये घेण्याचे मान्य केले. तसेच मंगळवार, 7 डिसेंबर रोजी स्टेट बँक चौकातील डॉलर शॉपीमध्ये लाच घेण्याचे ठरवण्यात आले. ही लाचेची रक्कम घुगे याने विशाल माकडे याच्यामार्फत स्वीकारली, तर विद्युत वसानी याने त्याला लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिली. त्यालाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींविरोधात यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर अधीक्षक अरुण सावंत, उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक किशोर म्हसवडे, निरीक्षक अमोल कडू, विनोद कुंजाम, सुनील जायभाये, शैलेश कडू यांनी यशस्वी केली.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...