*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
अधिवेशन संपताच ऊर्जामंत्र्यांनी स्थगिती उठवली
भारतीय वार्ता (प्रतिनिधी) : कर्ज व थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती नाजूक आहे. महावितरण ही जनतेची कंपनी असून तिला वाचविणे व सक्षम करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे सांगताना वीजबिलाच्या वसुलीला दिलेली स्थगिती उठवण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली.
विजेच्या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणने मोठी मोहीम सुरू केली होती. भाजप व मनसे बरोबरच आघाडीतील राजू शेट्टी यांनीही या विरोधात आंदोलन पुकारले होते. अधिवेशनातही याचे पडसाद उमटले, तेव्हा 2 मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसुलीला तात्पुरती स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठवण्यात येत असल्याचे निवेदन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत केले. कोरोनाच्या संकटात महानिर्मिती, महापारेषण, महावितरणने अनेक नैसर्गिक व आर्थिक संकटांचा सामना करून वीज ग्राहकांचा पुरवठा सुरळीत ठेवला आहे. जानेवारीपर्यंत कोणाचाही वीज पुरवठा बंद करण्यात आलेला नाही.
मात्र महावितरणची थकबाकी आता 71 हजार 506 कोटींवर गेली आहे. महावितरणवर 46 हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले असून, खरेदी केलेल्या विजेचे 12 हजार 700 कोटी रुपये देणे आहे. वसुलीसाठी कृषी ग्राहकांना भरघोस सवलती दिल्या आहेत. मात्र महवितरणची थकबाकी जर अशीच वाढत राहिली तर ते महावितरणच्या दृष्टीने धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे वासुलीवरील स्थगिती उठवण्यात येत असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नितीन राऊत यांनी केले .
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...