Home / चंद्रपूर - जिल्हा / जिल्हा स्तरीय शांतता...

चंद्रपूर - जिल्हा

जिल्हा स्तरीय शांतता समिती च्या अशासकीय सदस्य पदी श्री. महेश बळीरामजी देवकते यांची निवड

जिल्हा स्तरीय शांतता समिती च्या अशासकीय सदस्य पदी श्री. महेश बळीरामजी देवकते यांची निवड

जिल्हा स्तरीय शांतता समिती च्या अशासकीय सदस्य पदी श्री. महेश बळीरामजी देवकते यांची निवड

जिवती: जलद वेगाने बदलणाऱ्या वातावरणात पोलिसिंग करणे हे जटील काम झाले आहे. जनतेच्या सहभागाशिवाय पोलिसिंग साध्य होत नाही हा दृष्टिकोन लोकशाहीने स्वीकारलेला आहे. विशिष्ट धर्म, जाती, केवळ लोकसंख्येमुळे दबावाखाली आलेल्या आपल्यासारख्या लोकशाहीबाबत तर हे अधिक खरे आहे. मोहल्ला समिती हे सामुदायिक पोलिसिंग उपक्रमांचे अविभाज्य अंग आहे.”

नावाप्रमाणेच मोहल्ला समित्या या स्थानिक भागात स्थापन केल्या जातात. यामध्ये समाजाच्या प्रत्येक स्तरावरील लोकांचा समावेश असतो.  मोहल्ला समित्यांची स्थापना व त्यांना सहाय्य यांची जबाबदारी स्थानिक पोलीस ठाण्यावर असते. पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत करणे तसेच आपल्या भागातील गुन्ह्यांचा प्रतिबंध करणे हे मोहल्ला समित्यांचे मुख्य काम असते.  मोहल्ला समित्यांचे सदस्य पोलिसांचे कान व डोळे होऊन काम करतात आणि सांप्रदायिक, सामाजिक, कायदा-सुव्यवस्थाविषयक माहिती ते स्थानिक क्षेत्र अधिकाऱ्याला (बीट ऑफिसर) देतात. या अधिकाऱ्याच्या ते सतत संपर्कात असतात. याशिवाय कायदा व सुव्यवस्था विषयक समस्यांचा प्रतिबंध व व्यवस्थापन करण्यात या समित्या महत्त्वाची भूमिका बजावतात. मोहल्ल्या समित्यांच्या वर्षभर नियमित बैठका होत राहतात. बीट कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून स्थानिक गुन्हे व वाद निवारण्याबद्दल या समित्या चर्चा करतात. मोठ्या उत्सवांच्या काळात संबंधित भागात शांतता राखण्यासाठी समित्यांच्या विशेष बैठका बोलावल्या जातात. 

"समाजातील प्रतिष्ठित व आदरणीय सदस्यांचे नामांकन मोहल्ला समितीवर व्हावे यासाठी विशेष काळजी घेतली जाते. बैठकांमध्ये चर्चिल्या गेलेल्या उपाय व निर्णयांचा प्रसार सदस्यांच्या माध्यमातून समाजात केला जातो. गुन्हे प्रतिबंध उपाय निश्चित करणे व अमलात आणणे याबाबत मोहल्ला समितीच्या सदस्यांनी दिलेल्या सूचनांना पोलीस ठाण्यात बरेच महत्त्वा दिले जाते.”

"मोहल्ला समिती अभियानाचा लोकशाहीवादी दृष्टिकोन व जनसहभाग यांची गेल्या काही वर्षांत सर्वदूर प्रशंसा झाली आहे. मोहल्ला समित्यांनी त्यांची उपयुक्तता वेळोवेळी सिद्ध केली आहे आणि महाराष्ट्र पोलीस समुदायाच्या सामुदायिक पोलिसिंग उपक्रमांचा त्या आता अविभाज्य भाग झाल्या आहेत.”

राज्यात कायदा  व सुव्यवस्था, जातीय सलोखा व शांतता राखण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाने शांतता समित्या स्थापन करण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यातील  शांतता समिती मध्ये जिल्हाधिकारी हे या समिती चे अध्यक्ष व अति. पोलीस अधीक्षक हे सचिव म्हणून कामकाज पाहत असतात आणि यामध्ये लोकप्रतिनिधी खासदार, आमदार व अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती व समाजातील विविध प्रकारच्या ठिकाणी काम करण्याऱ्या प्रतिष्ठीत व्यक्तीला या मध्ये जिल्हाधिकारी अशासकीय सदस्य म्हणून घेत असतात. ही समिती जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, जातीय सलोखा व शांतता राखण्याच्या दृष्टीकोनातून काम करीत असते. या समिती मध्ये अतिदुर्गम व डोंगरावर असलेल्या जिवती तालुक्यातील युवक श्री.महेश बळीरामजी देवकते यांच्या कामाची दखल घेऊन, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी या समितीत सदस्य म्हणून निवड केलेली आहे. महेश देवकते यांच्या निवडीमूळे जिवती तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...