Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी तालुका युवक...

चंद्रपूर - जिल्हा

ब्रम्हपुरी तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रभाकर उर्फ सोनू नाकतोडे यांची नियुक्ती..!

ब्रम्हपुरी तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रभाकर उर्फ सोनू नाकतोडे यांची नियुक्ती..!

ब्रम्हपुरी(प्रतिनिधी): अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.बी.व्ही.श्रीनिवास व प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मान्यतेने युवक काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या. त्यानुसार ब्रम्हपुरी तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रभाकर उर्फ सोनु नाकतोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रपुर येथील एका कार्यक्रमात युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानीताई वडेट्टीवार, जिल्हा प्रभारी इरशाद शेख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीश कोत्तावार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

  प्रभाकर उर्फ सोनू नाकतोडे हे ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापुर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. सोबतच ते एक यशस्वी युवा उद्योजक असुन यापुर्वी ते संभाजी ब्रिगेड पक्षाचे ब्रम्हपुरी तालुका उपाध्यक्ष होते. ब्रम्हपुरी तालुक्यातील युवकांमध्ये ते लोकप्रिय युवा व्यक्तिमत्त्व असुन त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. बेधडक, रोखठोकपणे नागरिकांची कामे करण्याची त्यांची शैली हे त्यांचे वैशिष्ट्य असुन यामुळे जनमानसात त्यांची प्रतीमा प्रभावी आहे.

त्यांच्या नियुक्तीमुळे ब्रम्हपुरी तालुक्यात युवक काँग्रेसला मोठी बळकटी मिळणार असुन काँग्रेस पक्षाचे विचार सर्वस्तरावरील लोकांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने  व संगठन मजबूत करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे सोनू नाकतोडे यांनी सांगितले आहे. त्यांच्या सदर नियुक्तीबद्दल ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमेटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, ब्रम्हपुरी शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, महिला काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा मंगलाताई लोनबले, जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, नगरपरीषदेचे गटनेता विलास विखार, पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार यांसह ब्रम्हपुरी तालुक्यातील अन्य काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...