Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / धनगर समाजातील विद्यार्थ्यांना...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश घेण्याचे आवाहन..

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश घेण्याचे आवाहन..

वर्ग १ ली व २ री मध्ये मिळणार प्रवेश, योजनेअंतर्गत १२ वि पर्यत मोफत निवासी शिक्षण मिळेल.

आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) :  धनगर समाज बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र शासनाने धनगर समाजातील मुलां- मुलींकरिता वर्ग पहिलीपासून वर्ग बारावी पर्यंत नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत मोफत निवासी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.ह्या संदर्भात यवतमाळ जिल्हा करिता रेड्डीज कॉन्व्हेंट पाटणबोरी तालुका केळापूर म्हणजेच पांढरकवडा जिल्हा यवतमाळ या शाळेची खास धनगर समाजाच्या मुला मुलींकरिता प्रवेश देण्यासाठी निवड केलेली आहे.धनगर समाजाच्या मुला मुलींकरिता या योजनेअंतर्गत शिक्षण हे पहिलीपासून ते बारावी पर्यत मोफत आहे. प्रवेश घेताना वर्ग पहिली किंवा दुसरी म्हणजेच विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षे पूर्ण किंवा सात वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. वय ७ च्या वर असणारे विद्यार्थी अपात्र ठरेल. या योजनेअंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच निवासाची व भोजनाची मोफत सुविधा मिळेल. मुलांकरिता व मुलींकरिता स्वतंत्र वस्तीगृह असणार आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र निवासी वैद्यकीय अधिकारी व परिचारिका असून स्वतंत्र पुरुष व स्त्री अधीक्षिका नेमलेले आहेत. रेड्डीज कॉन्व्हेंट पाटणबोरी येथे पहिल्या वर्गापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत सोय असून शाळा व कॉलेजचे परिसर तीस एकर मध्ये विस्तारलेले आहे. सर्व प्रकारच्या क्रीडा सुविधा विद्यार्थ्यांसाठी येथे उपलब्ध आहे.रेडीज कॉन्व्हेंट अँड कॉलेजचे परिसर हे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 24 तास सीसीटीव्ही कॅमेरा च्या निगराणीत आहे.संस्थाचालक आपल्या कुटुंबासह शालेय परिसरात निवासी असतात. रेड्डीज कॉन्व्हेंट अँड कॉलेज पाटणबोरी ही शाळा तीस वर्षापासून सातत्याने विद्यार्जन करीत असून शेकडो विद्यार्थी जगातल्या कानाकोपऱ्यात यशस्वी जीवन जगत आहे. धनगर समाजातील मुलां-मुलीकरिता मोफत निवासी इंग्रजी शाळेत प्रवेशाचा शासनाचा जीआर निघालेला आहेत. धनगर समाज हा आर्थिक, राजकिय, सामाजिक, दृष्ट्या मागासलेला आहे. धनगर मेंढपाळ सतत भटकंती करीत असतात त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा या योजनेचा लाभ निश्चितच धनगर समाजातील मेंढपाळ यांनी घ्यावा असे आवाहन समाजाकडून होत आहे. या योजनेच्या सविस्तर माहिती साठी सुरेश रेड्डी, अध्यक्ष, रेड्डीज कॉन्व्हेंट स्कूल पाटणबोरी, संपर्क क्रमांक 8329316773 / 9422167557  / 8888316366 यांच्याशी संपर्क साधावा.

ताज्या बातम्या

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणीतील बातम्या

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...