Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती पोलिसांचा...

चंद्रपूर - जिल्हा

भद्रावती पोलिसांचा विनाकारण बाहेर फिरणा-यांची अँटिजण चाचणी..

भद्रावती पोलिसांचा विनाकारण बाहेर फिरणा-यांची अँटिजण चाचणी..

भद्रावती:  विनाकारण रस्त्याने फिरणा-या लोकांसोबतच कारणाने फिरणा-या नागरिकांनाही अडवून त्यांची अॅंटीजेन चाचणी केल्याने आतातायीपणा करणा-या पोलिसांबद्दल भद्रावती शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, दि.२२ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान येथील नगर परिषद कार्यालयासमोर पोलिसांनी रस्त्याने जाणा-या येणा-या नागरिकांना अडवून त्यांची नगर परिषदेच्या तळमजल्यावरील एका ब्लाॅकमध्ये अॅंटीजेन चाचणी करणे सुरु केले. मात्र ही चाचणी विनाकारण फिरणा-यांची होती की सरसकट या रस्त्याने जाणे-येणे करणा-या सर्वांचीच होती.हे कळायला मार्ग नाही. कारण पोलिसांनी या रस्त्याने जाणा-या येणा-या सर्वच नागरिकांची अॅंटीजेन चाचणी करुन टाकली. एकीकडे रस्त्याने विनाकारण फिरणा-या लोकांची चाचणी करणे योग्य आहे. परंतू जे नागरिक आपल्या नोकरीवरील  कर्तव्य बजाविण्याकरीता आपल्या कार्यालयात जात असतील, त्यांनाही विनाकारण फिरणारे म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे योग्य आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

  विशेष म्हणजे येथील एका शाळेतील एक महिला कर्मचारी आपले कर्तव्य बजावून आपल्या घराकडे परत जात होती. तीला पोलिसांनी अडविले व अॅंटीजेन चाचणी करायला लावले. ती वारंवार पोलिसांना सांगत होती की, मी माझ्या कार्यालयातून कर्तव्य बजावून घरी जात आहे. तरीदेखील पोलिसांनी तिचे काहीही ऐकले नाही. शेवटी तिला खुप भूक लागली असताना रांगेत उभी राहून चाचणी करावी लागली. शिवाय रिपोर्ट मिळेपर्यंत ताटकळत राहावे लागले. त्यामुळे तिला मनस्ताप झाला.  रोज आपल्या कार्यालयात कर्तव्य बजाविण्याकरीता कसे जायचे ? असा प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाला आहे. पाझिटीव्ह रिपोर्ट आल्यास रिपोर्ट दिला जातो. मात्र निगेटीव्ह आल्यास रिपोर्ट दिल्या जात नाही. त्यामुळे चाचणी करणा-याकडे चाचणी केल्याचा पुरावा राहत नाही. मग त्याने रोज चाचणी करायची का हे  विशेष  सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत बॅंक कर्मचा-यांची वेळ असते. कार्यालयाची वेळ संपल्यानंतर घरी जाताना रस्त्यात अॅंटीजेन चाचणी करुनच बॅंक कर्मचा-यांना घरी जावे लागेल. त्यात निगेटीव्ह रिपोर्ट आला, तर परत दुस-या दिवशीही पुन्हा चाचणी करावी लागेल. पत्रकारांना वृत्त संकलनासाठी अडवू नये असे शासनाचे धोरण असताना पत्रकारांनाही पोलिसांनी अडवुन चाचणी करण्यास सांगितले जात होते. याबाबत तहसीलदारांशी संपर्क साधला असता विनाकारण फिरणा-या लोकांसाठी ही चाचणी असल्याचे सांगितले.विशेष म्हणजे ग्राम पंचायत निवडणुकीच्या निकालाचे वृत्त संकलन करण्याकरीता मतमोजणी केंद्रावर गेलेल्या पत्रकारांना निवडणुक अधिका-यांनी दिलेले प्रवेशपत्र असताना पोलिसांनी अडविले होते. 

 याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.संजय आसुटकर यांना विचारणा केली असता जे लोकं विनाकारण फिरतात त्यांचीच अॅंटीजेन चाचणी करायची आहे असे सांगितले. मग  भद्रावती पोलिस सरसकट कारण आणि विनाकारण फिरणा-या लोकांची चाचणी का करतात या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...