स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
कोरपना(प्रतिनिधी): गडाचांदुर येथील प्रभाग क्र 6 बाबाराव पुरके ते राजू कादरी यांचे घरापर्यंत चालू असलेले नालीचे काम मागील तीन महिन्यापासून सुरु असून तेथील बांधकाम हे अत्यंत निष्कृष्ठ दर्जाचे होत आहे. त्यात रेती सिमेंटचा वापर कमी करीत आहे, नालीला बॉक्स न लावता एक साईड सेन्ट्रीग लावून नालीची भिंत टाकली जात आहे. त्यामुळे अंदाजपत्रका नुसार खालील भिंतीची जाडीचे काँक्रेट टाकण्यात आले नाही. पोच रस्त्यावर रापट टाकले त्यात स्टील, सिमेंट चा वापर कमी केला आहे. रापट च्या बाजूने भिंतीची जाडी कमी टाकली आहे. त्यामुळे तेथील काम दर्जेदार झाले नाही. आताच काही ठिकाणी काँक्रेट क्रॅक झाले आहे व काही दिवसातच ते काम कोसळू लागले असे आढळून येत आहे व नगर परिषदची आर्थिक हानी होत आहे. तेव्हा नगर परिषदचे हित लक्षात घेता आपण योग्य चौकशी करून ते काम दर्जेदार करून घेण्यात यावे.
अशा दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदाराचा परवाना काळ्या यादीत समाविष्ठ करण्याची कार्यवाई करण्यात यावी अशी मागणी प्रभाग क्रमांक 6 सिद्धार्थ विहार गडचांदूर येथील समस्त नागरिक करीत आहे. त्याकरिता समस्त प्रभागातील नागरिकांनी त्या सदर कामाची चौकशी करावी व उत्कृष्ट दर्जाचे काम त्या ठिकाणी करण्यात यावे यासाठी मा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, मा जिल्हाप्रशासन अधिकारी न प विभाग जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, मा.नगराध्यक्ष न प गडचांदूर, मा. अरविंद तुकाराम डोहे विरोधी नगरसेवक न प गडचांदूर, सागरभाऊ ठाकूरवार विरोधी नगरसेवक न प गडचांदूर, कल्पनाताई अरुणजी निमजे बांधकाम सभापती न प गडचांदूर, शेख सरवर शेख शालू नगरसेवक प्रभाग क्र 6, मीनाक्षीताई अशोकजी ऐकरे नगरसेविका न प गडचांदूर, नगराध्यक्षा न प गडचांदूर या सर्वाना तेथील नागरिकांना निवेदन दिले. तरी ठेकेदारावर कारवाही करावी असे समस्त नागरिकांची मागणी आहे.
4 दिवसा अगोदर सिद्धार्थ विहार गडचांदूर प्रभाग क्र 6 येथील नाली बांधकामचे काम सुरु आहे सदर नागरिकांनी नगरपरिषद गडचांदूर येथे तेथे होत असलेले काम नित्कृष्ट दर्जाचे होत आहे असे निवेदनातून सांगितले मात्र त्या कामाची नगरपरिषद बांधकाम विभागाकडून पाठराखण होत आहे आणि आज तेथे ट्रॅक्टर जात असताना नाली फुटून फसलेले आहे तरीही नगरपरिषदेतील बांधकाम विभाग गाढ झोप घेत आहे जर या कामाची चौकशी करून व्यवस्थित रित्या त्या नालीचे बांधकाम होत नसेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा तेथील नागरिक करीत आहेत.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...