*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
6 कोटी 47 लाख रूपये शिल्लकीचे अंदाजपत्रक
वणी: येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात अर्थसंकल्पीय विशेष सभा गुरुवारी पार पडली. यात वणी नगर परिषदेने पुढील 2021- 22 साठी 137 कोटी 37 लाख रुपयांचे अर्थसंकल्प मंजूर करण्यात आले. त्यात 6 कोटी 47 लाख शिलकीचे अंदाजपत्रक आहे. मागील 2020-21 या वर्षी 5 कोटी 15 लाख रुपये शिल्लकीचे अंदाजपत्रक होते. या अर्थसंकल्पीय विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी वणी नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे होते. त्यांचे सोबत व्यासपीठावर मुख्याधिकारी संदीप माकोडे, उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे हे उपस्थित होते. या सोबत नगर परिषदेचे सर्व विषय समित्यांचे सभापती, नगर परिषद सदस्य, विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. पुढील 2021- 22 च्या अर्थसंकल्पात प्रारंभिक शिल्लकीसह महसूली जमा 36 कोटी 3 लाख 43 हजार 889 रुपये आहे. महसुली खर्च 35 कोटी 97 लाख रुपये आहे. यात 6 लाख43 हजार 889 रुपये अखेरची शिल्लक राहणे अपेक्षित आहे. भांडवली जमा 101 कोटी 55 लाख 43 हजार 790 रुपये जमा अपेक्षित आहेत. यात 95 कोटी 14 लाख 86 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यात 6 कोटी 40 लाख 57 हजार 790 रुपये शिल्लक राहणे अपेक्षित आहे.
वणी नगर परिषदेमध्ये 2021- 22 च्या अर्थसंकल्पात प्रारंभिक जमा 55 कोटी 12 लाख 79 हजार 179 रुपये आहेत. पुढील वर्षी 82 कोटी 46 लाख 8 हजार 500 रुपये विविध माध्यमातून जमा होणे अपेक्षित आहे. असे एकूण पुढील वर्षी 137 कोटी 58 लाख 87 हजार 679 रुपये जमा होतील असा अंदाज आहे. यातील पुढील वर्षी 131 कोटी 11 लाख 86 हजार रुपये अपेक्षित खर्च वगळुन 6 कोटी 47 लाख रुपये शिल्लक राहिल असे अंदाजपत्रक आज मंजूर करण्यात आले आहे. विकास कामासाठी 2021- 22 या वर्षात 6 कोटी 50 लाख रुपये शासनाकडून विविध योजनांकरिता निधी मिळणे अपेक्षित आहे.
या सभेत 2020- 21 या आर्थिक वर्षात नगर पालिकेचे 144 कोटी 95 लक्ष रुपयांचे जमा खर्च मंजूर करण्यात आले आहे.
भांडवली जमाखर्च आहे तो दोन वर्षे करोना असल्याने हे येने अशक्य आहे. त्यामुळे जो खर्च दाखविला अशक्य आहे: पी के टोगे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक
सदर अंदाज पञका मध्ये आकडे फुगवून दाखविले असले तरी न प कडे किती महसुल जमा होतो व सरकार कडून येनारा निधी तसा येने गरजेचे आहे परतू कोरोना मुळे महसुल कीती जमा होनार व सरकारी निधी कीती येनार यात तफावत आहे. तसेच नियमा प्रमाने पाणी, स्वच्छता, विधुत खर्च याचे वेगळे विवरण दाखविले पाहीजे सम्पूर्ण यञनेवर खर्च कीती होनार व कीती पैसे परत मिळणार याचे वेगवेगळे विवरण दाखवने गरजेचे होते वक्ष कर अग्निशमन कर याचे आकडे जास्त असुन उपयुक्तता शुल्क कमी आहे याची दुरूस्ती करने गरजेचे आहे.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...