Home / चंद्रपूर - जिल्हा / पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या...

चंद्रपूर - जिल्हा

पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी योजना

पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी योजना

इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व संस्थाना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 13 ऑक्टोबर : केंद्र शासनाने सन 2020-21 या वर्षापासुन पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी या नवीन योजनेस मंजुरी प्रदान केली आहे. सन 2021-22 या वर्षात या योजनेकरीता 15 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत दुध प्रक्रिया (आईसक्रीम, चीजनिर्मिती, दुधपाश्चराईजेशन, दुध पावडर  इ.), मांस निर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटिन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उदयोग व्यवसायांना 90 टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार असून व्याज दरामध्ये 3 टक्के सुट देण्यात येणार आहे.

योजनेच्या सर्व मार्गदर्शक सुचना, योजनेसंदर्भात वारंवार उपस्थित होणारे प्रश्नोत्तरे, योजनेसाठी ऑनलाईन पदधतीने सादर करावयाचा अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या http://dahd.nic.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या http://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असून योजनेच्या मार्गदर्शक सुचना प्रसिदध करण्यात आल्या आहेत. सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलव्दारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे.

केंद्र शासनाने वर नमुद उदयोग व्यवसायासोबतच लिंग विनिश्चित वीर्यमात्रा निर्मिती, बाह्यफलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन याबाबींचा समावेश केला आहे. सदर योजनेचा व्यक्तिगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी यांना लाभ देता येईल.

राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाचा पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी उपयुक्त असुन ईच्छुक व्यावसायिक, उदयोजक व संस्थानी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी व पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती सुनिल ऊरकुडे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...