Home / महाराष्ट्र / एक प्रेरणादायी प्रवास:...

महाराष्ट्र

एक प्रेरणादायी प्रवास: 'सूर्या' लेखक, दिग्दर्शक शरद गोरेंची समाजाला दिशा देणारी नवी कलाकृती.

एक प्रेरणादायी प्रवास: 'सूर्या' लेखक, दिग्दर्शक शरद गोरेंची समाजाला दिशा देणारी नवी कलाकृती.

भारतीय-वार्ता (वणी):   विविध विषयांवर नव नवीन चित्रपट मनोरंजना साठी येत असतात मनोरंजनातून प्रबोधन करण्याचे सूञ हे फार मोजक्याच लेखक आणि दिग्दर्शक यांना शक्य होते साहित्य विश्वात  साऱ्या महाराष्ट्राला परिचित असलेलं नाव म्हणजे शरद गोरे!अतिशय गरीब शेतकरी कुंटूंबातील होणारी आर्थिक चणचण,कर्जबारी पणा सावकाराकडून होणारी पिळवणूक यातून होणारी कुटूंबाची परवड,या गर्द  काळोखातून संघर्ष करीत आपल्या आई वडिलांसाठी समर्पित भावनेने स्वप्नांचा यशस्वीपणे पाठलाग करणारा व विविध प्रकारच्या संकटाच्या छाताडावर मोठया हिंमतीने उभा राहणारा मुलगा म्हणजे सूर्या. 

 सूर्या या नायकाचा संघर्षपूर्ण प्रवास नव्या पिढीस नक्कीच उदबोधक व प्रेरणादायी ठरवा असाच आहे, या संघर्षातून तो कसा जिल्हाधिकारी होतो हा प्रवास अतिशय प्रभावी पध्दतीने लेखक,दिग्दर्शक शरद गोरेंनी चिञीकरणातून या चित्रपटात मांडला आहे,  सूर्या या नायकाची भूमिका  नितीन पाटील यांनी खूप प्रभावीपणे साकारली आहे,प्राची सुर्यवंशी हि नायिकेच्या तर राहूल शिंदे वडील व सुजाता काळोखे आईच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे लेखक,दिग्दर्शक शरद गोरे हे प्रथमच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत, सुनील साबळे,अमोल कुंभार,रोहिणी कोकणे, दिव्या माने हे सहकलाकार आहेत, नील पाटील,विक्रांत नळे या बालकलाकारांनी आपल्या भूमिका उत्तम केल्या आहेत, छायांकन रवींद्र लोकरे यांनी केले आहे तर सुवर्णा पवार,प्रकाश बनसोडे, डाॅ.गणेश महामुणी व शरद गोरे यांनी गीत लेखन केले असून,ज्ञानेश्वर मेश्राम ,जितेंद्र अभ्यंकर,राखी चौरे,राजेश्वरी पवार आदी गायकांनी गाण्यांना सुमधूर असा स्वरसाज चढिवला आहे,तर शरद गोरे यांनी अतिशय श्रवणीय संगीत दिले आहे, शरद गोरे यांनी दिग्दर्शित केलेला  प्रेमरंग हा चित्रपट 2019साली प्रदर्शित झाला होता, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गेली 28 वर्षे साहित्य संवर्धनाचे काम करीत आहेत,
GSM films ने या चिञपटाची निर्मिती केली असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...