शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
एका आरोपीस जोधपूर(राजस्थान ) वरून अटक आरोपीला चार दिवसाची पोलिस कोठळी
वणी: शहरा पासून जवळच असलेल्या पूर्व दिशेला असलेल्या ब्रामणी मार्गावरील जिनिंग मालकास 45 लाख रुपयाने गडविण्याची घटना 21 मार्च रोजी दुपारी तीन वाजता घडली या घटनेतील मुख्य आरोपी फरार झाला असता तो राजस्थान मधील चेरई ईथे बुधवारी 14 एप्रिल ला दुपारी चार वाजता पकडले असून त्यास आजवणी न्यायालयात हजर केले असता 20 एप्रिल मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे तर बाकी काही आरोपी फरारी मध्ये आहे.
या घटनेतील मुख्य आरोपी बाबुलाल घोकलराम वैष्णो़॓॓ई ( ३५)रा लोहावत जील्हा जोधपुर( राजस्थान) हल्ली मुक्काम छोरीया ले-आऊट वणी हा पंधरा वर्षापासून शहरात राहून छोटी कामे करायचा यात त्याने जिनिंग परिसरामध्ये कत्राळदार म्हणून ओळख जमवीली व त्याने या परीसराचा संपूर्ण अभ्यास केला व इंदिरा जींनीग जिनिंग मध्ये आर्थिक व्यवहारा वर लक्ष केंद्रित केले संपूर्ण आर्थिक बाबीचा अभ्यास करून त्याने पूर्णता काही सहकारी कर्मचारी यांची मदत घेऊन यातील जिनिंग व्यवस्थापक म्हणून काम करणारे मनीष जंगले यावर लक्ष केंद्रित करून घटनेच्या दिवशी तो बँकेमधून 45 लाख रुपये दुचाकीने एका पिशवीत आणीत असतांना त्यानी त्याचा पाठलाग करून दुचाकीस चारचाकी वाहन आडवे करून जगले यास मारहाण करून ४५ लाखाची पिशवी घेऊन पोबारा केला पण वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेट बंद असल्याने डाव फसला वाहन गावातून नेले पण यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती समोर ऐक वाहून सोडून आरोपी फरार झाले या सूत्रांमुळे पोलिसांनी तपास त्या दिशेने करून आरोपीच्या दिशेने गुप्त माहिती वरुन आरोपीच्या दिशेने पथके सोडली तथा माहितीवरून राजस्थानला एक पथक पाठविले मात्र आरोपीच्या सुगावा लागत नोव्हता एकेवेळी निराशा पण पदरी पडली दुसऱ्या वेळी वणी गुन्हे शाखा, सह एलसीबी पथकांनी संयुक्त कारवाई केली यात वणी पोलीस, पोलीस तांत्रिक विभाग यानी पण सहयोग घेतला ठाणेदार वैभव जाधव यांनी जिनिंग मधील कामगार विषयी माहिती तपासून आरोपी बाबूलाल वैष्णई यावर लक्ष केंद्रीत करून लोहावत जिल्हा जोधपुर (राजस्थान ) ईथुन यास पकडले या विरुद्ध भादवी 394,395 गुन्हा दाखल करून आज शुक्रवारी न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी आरोपीला सुनावली आहे त्याने आपला गुन्हा कबूल केला असून कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील वाहना बाबत ही माहिती दिली या घटनेतील आरोपी पुन्हा वाढण्याची शक्यता असून पोलिस पुढील तपासात आहे यातील आरोपी कडून रक्कमे बद्दल विचारपूस चालू असून इतरांचा पन शोध घेणे सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सा पो नी गजानन करेवाड गुन्हे शाखा प्रमुख गोपाल जाधव हे का गजानन डोंगरे ,ऊल्हास कुरकुटे यांनी केली आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...