Home / चंद्रपूर - जिल्हा / अबब..! व्हीव्हीआयपी...

चंद्रपूर - जिल्हा

अबब..! व्हीव्हीआयपी नंबर साठी केल्या गेला ७० हजार रुपयाचा खर्च.

अबब..!  व्हीव्हीआयपी नंबर साठी केल्या गेला ७० हजार रुपयाचा खर्च.

मनपा शहरातील नागरिकांच्या पैशांच्या केला चुराडा, आयुक्तांविरुद्ध फौजदारीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.

उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी) : महापालिका आर्थिक संकटाचा सामना करीत असताना करोना महामारीच्या काळात आयुक्त राजेश मोहिते यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्यासाठी ११ लाख रुपये खर्च करून ‘अल्फा नेक्सा कंपनीची एक्सएल ६’ वाहन  खरेदी केले. विशेष म्हणजे, या वाहनाच्या अतिविशिष्ट (व्हीआयपी) क्रमांकासाठी ७० हजार रुपये खर्च केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. महामारीतही सामान्य जनतेच्या कराच्या पैशाची सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांकडून अशाप्रकारे उधळपट्टी सुरू असल्याने येथे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

महापालिकेत महापौर व आयुक्तांसाठी होंडा सिटी या कंपनीची कार आहे. अतिशय चांगल्या स्थितीतील महागडी कार असतानाही आयुक्त राजेश मोहिते यांनी करोना महामारीच्या काळात फेब्रुवारी महिन्यात महापौरांसाठी हे नवीन वाहन खरेदी केले. अतिविशिष्ट ‘एमएच ३४ बीव्ही ११११’ हा क्रमांक मिळावा यासाठी राज्य परिवहन विभागाकडे ७० हजार रुपये शुल्क भरण्यात आले.

एप्रिल महिन्यात या जिल्हय़ात करोना महामारीची दुसरी लाट उच्च पातळीवर होती. त्यावेळी रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, प्राणवायू, खाटा, इंजेक्शन, औषध आदींची आवश्यकता होती. मात्र या संकटाच्या काळात आयुक्तांनी महापौरांसाठी वाहन खरेदी व अतिविशिष्ट क्रमांकावर निधी खर्च केला. सरकारचे करोना उपचारावर निधी खर्च करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही अशाप्रकारे निधीचा दुरुपयोग केला गेला.

विशेष म्हणजे, शासकीय वाहनासाठी अतिविशिष्ट क्रमांक मिळावा म्हणून अशाप्रकारे शासकीय निधी खर्च करणे अयोग्य आहे. तेव्हा त्यांच्यावर उधळपट्टीचा ठपका ठेवून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय वडेट्टीवार तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली आहे. चंद्रपूर महापालिका आयुक्त यांच्या नावाने ‘अल्फा नेक्सा कंपनीचे एक्सएल ६’ वाहन आहे. २२ एप्रिलला या वाहनाची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली आहे. एमएच ३४ बीव्ही ११११ या अतिविशिष्ट क्रमांकासाठी महापालिकेने ७० हजार रुपये शुल्क धनादेशाद्वारे भरले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...