शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
मुख्य लेखापाल गौरकर यांचा मृत्यू , गजराज हत्तीला शांत करण्यात आले वन विभागाला यश
चंद्रपुर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी छावणीत गुरुवार 6 में रोजी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास एक गजराज नावाचा हत्ती चवथाळल्याने लेखापाल आणि सहायक वनसंरक्षक (एसीएफ) यांच्यावर जीव घेणा हल्ला केला यात मुख्य लेखापाल गौरकर यांचा मृत्यू झाला तर एसीएफ थोडक्यात बचावले. हि घटना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बोटेझरी छावणी परिसरात घडली. ताडोबा-अंधारी अभयारण्य राष्ट्रीय प्रकल्पात पर्यटना करिता बोटेझरी छावणीत गजराज नावाचा हत्ती आहे. येथे येणारे पर्यटक गजराजची शाही स्वारी करत पर्यटनाच्या
मनमुराद आनंद लुटतात. परंतु सध्या राज्यभरात सुरू असलेल्या संचार बंदीमुळे ताडोबा-अंधारी प्रकल्पात पर्यटनाची सफारी बंद आहेत.त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचे येणे-जाणे महिनाभरापासून थांबले आहे. गुरुवारी ताडोबा-अंधारी प्रकल्पातील बोटेझरी छावणीत गजराज सायंकाळी ८ च्या सुमारास अचानक आक्रमक झाला.अचानकपणे चवताळलेल्या गजराज हत्तीची माहिती अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाली नाही. याच परिसरात कोळसा प्रकल्पाचे कार्यालय आहे. कोळशा प्रकल्पाचे एसीएफ कुलकर्णी आणि मुख्य लेखापाल (एफडी टीएटीआर) हे या परिसरात दोघेही वाहनाने जंगलात पेट्रोलिंग करीत होते. त्यांचे वाहन चिखलात अडकले आणि जवळच आलेल्या हत्तीकडे पहात त्यांनी वाहन सोडले. चवथाळलेल्या हत्तीने दोघांवर हल्ला केला व दुर्दैवाने टीएटीआरचे मुख्य लेखापाल गौरकर यांचा या घटनेत मृत्यू झाला. तर एसीएफ मात्र थोडक्यात बचावल्याचे वृत्त हाती आले . रॅपिड रिस्पॉन्स टीम आणि पशुवैद्य टीएटीआरचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते . हत्तीला शांत आणि संयमित ठेवण्यासाठी रेस्क्यू करण्यात आले . या भागातील खेड्यातील वास्तव्यास असणा-या नागरिकांना चवथाळलेल्या हत्ती बाबत सावध करण्यात आले. हत्तीला पकडण्यासाठी व अनुचित प्रकार घडू नये यासाठी ताडोबा अंधारी प्रशासनाचा वतीने अनेक प्रयत्न केले गेले होते व त्या हत्तीला वन विभागाने पकडून त्याला शांत केले असून आता तो स्थिर असल्याचे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मुख्य अधिकारी यांनी सांगितले आहे
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...