श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
वाघाच्या हल्यामुळे गावात भितीचे वातावरण
वणी: तालुक्यातील पिवरडोल गावालगतच्या शेतशिवारात वाघाने हल्ला करून तरुणाला ठार केल्याची धक्कादायक घटना काल ९ जुलैला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
या घटनेचे तीव्र पडसाद गावात उमटले असून वाघाला पकडल्याशिवाय तरुणावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबासह गावकऱ्यांनी घेतल्याने या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पांढरकवडा वनविभागाचे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी ठेवण्यात आला आहे.
पिवरडोल या गावातील १८ वर्षीय तरुण रात्री गावालगतच्या शेतशिवारात शौचास गेला होता. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. मुलगा बराच वेळ घरी न आल्याने कुटुंबीयांनी गावातील काही लोकांना घेऊन शेतशिवारात पाहणी केली असता त्यांना वाघाच्या पायाचे ठस्से व मुलाचे साहित्य तसेच रक्ताचे डाग दिसून आल्याने त्यांनी त्यादिशेने जाऊन बघितले असता झुडपात त्यांना वाघ दिसून आला. तो मुलाचे लचके तोडत असताना दिसला गावकऱ्यांनी त्यास पिटाळून लावले.
घरापासून काही अंतरावर शौचास गेलेल्या अविनाश पवन लेनगुरे या १८ वर्षीय तरुणाचा वाघाने बळी घेतल्याने कुटुंबावर फार मोठा आघात झाला आहे. अविनाश हा कुटुंबाचा एकमेव आधार होता. तो ऑटो चालवुन कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. आई वडील व बहिणीचा आधारच त्याच्या जाण्याने हिरावला आहे.
या घटनेनचे तीव्र पडसाद गावात उमटले असून, या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशाराच गावकऱ्यांनी दिला असून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासही नकार दिला आहे. त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी गावातील इतर लोकांना याबाबत माहिती दिली, व मोठ्या संख्येने लोकं घटनास्थळाकडे आले होते
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...