Home / विदर्भ / अकोला / आंबेडकर-बच्चू कडूच्या...

विदर्भ    |    अकोला

आंबेडकर-बच्चू कडूच्या भेटीने नेत्यांच्या भुवया उंचावल्यात..!

आंबेडकर-बच्चू कडूच्या भेटीने नेत्यांच्या भुवया उंचावल्यात..!

अकोला (जिल्हा-प्रतिनिधी) : भाजप व वंचित बहुजन आघाडी वगळता जिल्ह्यातील राजकारणात इतर पक्षांमध्ये निर्माण झालेली नेतृत्वाची मोठी पोकळी आणि या पार्श्वभूमी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर व प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांची अकोल्यात झालेली भेट जिल्ह्यातील नवीन राजकीय समीकरणाला जन्म देणारी ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्याचा श्रीगणेशा जिल्हा परिषदेतील राजकारणातून होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तीन महिने ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. त्यांच्या अनुपस्थितीत वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषद पोटनिवडणूक लढविली. आता पुन्हा ॲड. आंबेडकर सक्रिय झाले आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ते तीन दिवस अकोल्यात मुक्कामी होते. याचदरम्यान शनिवारी बच्चू कडू यांनी अकोल्यात ॲड. आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. सदिच्छा भेटीनंतर मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रहारची अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एन्ट्री झाल्यानंतर येथील राजकीय वर्तुळात निर्माण झालेली पोळकी भरून काढण्याच्या दृष्टीने प्रहारकडे बघितले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांना एकत्र आल्यानंतरही जिल्ह्यात फारसा प्रभाव पाडता आला नसल्याचे पोटनिवडणुकीतून दिसून आले. त्यात काँग्रेसची एकला चलोची भूमिका महाविकास आघाडीसाठी मारक ठरली.अशा परिस्थितीत प्रहारने अकोला जिल्हा परिषदेत एन्ट्री करताना महाविकास आघाडीच्या अपयशाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेली ॲड. प्रकाश आंबेडकर व बच्चू कडू यांची भेट जिल्ह्यातील एका नव्या राजकीय समीकरणाला जन्म देणारी ठरू शकते, असे संकेत मिळू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
जिल्हा परिषदेत सोबत येण्याचे संकेतअकोला जिल्हा परिषदेतील १४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या अपयशामुळे वंचित बहुजन आघाडीला जीवदान मिळाले आहे. मात्र, संख्या बळाचा विचार करता भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून वंचित गाफील राहणार नाही, याचे संकेत बच्चू कडू यांच्या भेटीतून मिळाले आहेत. दोन सभापतींच्या निवडणुकीत प्रहारला सोबत घेत जिल्ह्यातील नवीन राजकीय समीकरणाची मुहूर्तमेढ रोवल्या जाऊ शकते, अशी चर्चाही या भेटीनंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.महानगरपालिका निवडणूकही लक्षवंचित बहुजन आघाडीने ग्रामीण भागात चांगला जम बसविला असला तरी महानगरपालिका क्षेत्रात अपेक्षित यश या पक्षाला मिळाले नाही. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीचा विचार करता वंचित-प्रहार एकत्र झाल्यास मनपा निवडणुकीच्या निकालावर त्याचा मोठा परिणाम दिसून येऊ शकतो.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...