Home / महाराष्ट्र / संभाजी ब्रिगेडच्या...

महाराष्ट्र

संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांना यापुढे 'वादळा' सारखे काम करावे लागेल...!

संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांना यापुढे 'वादळा' सारखे काम करावे लागेल...!

संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांना यापुढे 'वादळा' सारखे काम करावे लागेल...!

पुणे (प्रतिनिधी):  संभाजी ब्रिगेड राष्ट्राला समर्पित कॅडरबेस संघटन आहे. व्यवस्था परिवर्तन हा संभाजी ब्रिगेड'चा श्वास आहे. महाराष्ट्रातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी संभाजी ब्रिगेड चा कार्यकर्ता सतत धडपड करत आहे. आपली जुनी संभाजी ब्रिगेड नव्या पद्धतीने परत आक्रमक दाखवावी लागेल. माझी जबाबदारी जास्त आहे हे प्रत्येकाला वाटले पाहिजे. कुणाच्याही अडचणीच्या काळात संभाजी ब्रिगेड धावून जाते...! न्याय मिळवून देते...! हे वेगळे सांगायची गरज नाही. जनतेच्या प्रश्नाला सर्वोच्च केंद्रबिंदू मानून लोकहितासाठी संघर्ष करणारी व्यवस्था म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे. सर्वसामान्यांना १००% न्याय आजपर्यंत संभाजी ब्रिगेडचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता हा देत आलेला आहे. आम्ही संघर्ष करतो, मात्र त्याचा रॉयल्टी वजा फायदा संघटनेसाठी करून घेत नाही, त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये संख्यांची बेरीज होत नाही. संभाजी ब्रिगेडची स्टाईल हा महाराष्ट्राचा वैचारिक क्रांती चा इतिहास आहे. आदरयुक्त वादळ म्हणून संभाजी ब्रिगेड गेली ३० वर्षापासून आक्रमक, बुलंद व हक्काचा आवाज म्हणून महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचला. लोकांना संभाजी ब्रिगेड आपली वाटली पाहिजे... यासाठी संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता मरगळ झटकून वादळासारखे काम केलं पाहिजे. कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून नवीन माणसांना जोडण्याचं काम आता प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले पाहिजे.

पूर्णवेळ कार्यकर्ते आपल्याला अपेक्षित आहेत. संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक जिल्हा, तालुका आणि शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी आपली कार्यकारिणी पुनर्गठित केली पाहिजे. सर्वांना संभाजी ब्रिगेड मध्ये सामावून घेऊन त्यांच्या खांद्यावर संभाजी ब्रिगेडचा भगवा 'झेंडा' देऊन प्रत्येक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली पाहिजे. संभाजी ब्रिगेड वादळ आहे, ते कुणासाठी ही थांबणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडला कुटुंब मानून यापुढेही काम करावं लागेल. म्हणून संभाजी ब्रिगेड ग्राम पातळीपासून शहर आणि जिल्हा शाखेपर्यंत कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन झालं पाहिजे. या यासाठी सर्वांनी वेगवेगळ्या पध्दतीने अंग झटकून काम केलं पाहिजे. गटबाजी, हेवेदावे हे आपल्याला चालणार नाही. यासाठी एकमेकांचा सन्मान करून संघटन वाढीसाठी आता घराच्या बाहेर रस्त्यावर येऊन काम केलं पाहिजे. 'गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता...' हे संभाजी ब्रिगेडचे यापुढेही ब्रीद असलेच पाहिजे.

आपण सर्वसामान्य लोकांसाठी काम करतो. संभाजी ब्रिगेड प्रा.लि. कंपनी नसून सर्वांसाठी अनलिमिटेड विचारधारा आहे. तरुण, विद्यार्थी, कष्टकरी, कामगार, शेतकरी व सर्वसामान्य जनतेसाठी आजपर्यंत लढत आलेलो आहोत. या सर्वांना आता चांगला पर्याय म्हणून संभाजी ब्रिगेड परिवारात आणलं पाहिजे. 'सदस्य नोंदणी' जास्तीत जास्त झाली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. १००% समाजकारण आणि १००% राजकारणात संभाजी ब्रिगेड भविष्यात इतिहास घडवणार आहे. यासाठीच संभाजी ब्रिगेडचा प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका व इतर पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहे. तो अजून सक्षमपणे काम करावे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकारी म्हणून जबाबदारी दिली पाहिजे. काम वाढवलं पाहिजे. यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कामाची आखणी केली पाहिजे. म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मा. अॕड. मनोज आखरे व महासचिव मा. सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड ची घोडदौड सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दि. 21, 22, 23 मे 2021 रोजी राज्यस्तरीय बैठक घेऊन संभाजी ब्रिगेडच्या सर्व राज्य पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांना स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत की, यापुढे १) संभाजी ब्रिगेडचे संघटन वाढीसाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावेत. २) कार्यकारणीचे पुनर्गठन करावे, ३) जिल्हा आणि इतर सर्व कार्यकारणी वाढवाव्यात. ४) जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांना वेगळे वेगळ्या पदावर काम करण्याची संधी द्यावी. ५) संघटन वाढीसाठी प्रत्येकाला संधी द्यावी आणि त्यांच्याकडून काम करून घ्यावे... असा स्पष्ट आदेश देण्यात आलेला आहे.

संभाजी ब्रिगेड आपलं कुटुंब आहे. संभाजी ब्रिगेडचे विचार हे महाराष्ट्र साठी प्रेरणादायी आहे. युगपुरुष मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी दिलेले विचार राष्ट्राला समर्पीत आहेत. आपल्याला हे विचार सगळ्यांना एकत्र मिळून पुढे घेऊन जायचे आहेत. कारण महापुरुषांच्या विचारांची पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळ म्हणून संभाजी ब्रिगेड वर फार मोठी जबाबदारी आहे. आपल्याला समाजकारणा बरोबर राजकारण सुद्धा आपल्या हिंमतीवर करायचा आहे. त्यामुळे आपल्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी इतर पक्ष्यांच्या नेत्याचे किंवा कार्यकर्त्यांची स्टेफनी म्हणून काम करू नये. डबल ढोलकी कार्यकर्ते कार्यकारणी मध्ये अजिबात नसले पाहिजे. दोन डगरींवर पाय असणारी माणसं नेहमी धोका देतात हा इतिहास आहे. म्हणून 'एक झेंडा आणि एक दांडा...' हातात घेणारेच कार्यकर्ते आपल्याला अपेक्षित आहेत. त्याच पद्धतीने आपली पुढची दिशा असली पाहिजे.

आपल्या नेतृत्वाच्या खांद्यावर'ची जबाबदारी आपण सर्वांनी वाटून घेतली तरच आपलं संघटन वाढेल. समाजाचा प्रत्येक प्रश्न हा आपला प्रश्न म्हणून आपण सोडवला पाहिजे. आपण सतत हजरजबाबी, आक्रमक, संघटनात्मक आणि धोरणात्मक काम केलं पाहिजे. आपल्या नेत्यांना आपला अभिमान वाटावा, आपल्या कामाचं कौतुक व्हावं... यासाठी आपल्याला सर्वोच्च काम करावे लागेल. तरच भविष्यामध्ये आपल्या नेतृत्वाचा मानसन्मान होईल आणि संभाजी ब्रिगेड ची वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये अबाधित राहील. यासाठी प्रामाणिक निष्कलंक व प्रेरणादायी पदाधिकारी आणि कार्यकर्ते घडवावेत. यासाठीच आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे. कारण आपण लढणारे कार्यकर्ते आहोत. 'संभाजी ब्रिगेड आपल्या दारी...' हा विश्वास प्रत्येकाला मिळाला पाहिजे.

मी लढलो तरच माझ्यासोबत लढणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. म्हणून बळ, बुद्धी आणि चातुर्य वापरून व्यवस्थेतील जळमटं आपल्याला बाजूला काढायचे आहेत. विचारांच्या दिशा वाढवून कामाचा पाऊस पडल्याशिवाय यापुढे आपल्याला तरणोपाय उरणार नाही. वेगवेगळ्या पक्ष्यांची, नेत्यांची स्पर्धा सुरू असल्यामुळे आपल्यालाही त्या स्पर्धेत दिमाखात चालायचा आहे. त्यासाठी आपले संघटन मजबूत केले पाहिजे. म्हणून कार्यकर्त्यांची फळी वाढवण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी 'संघटनात्मक' प्रयत्न करावा. थांबू नका, दुसऱ्याला टाळी द्या. 'चांगले काम' हीच आपली पुढची कार्यक्षम दिशा असेल. चला कामाला लागू...

आपण लढत राहू, माणसं जोडत राहू, 
लढणारांची संख्या आपोआप वाढत राहील...!

जय जिजाऊ...!! जय शिवराय...!!!

- संतोष शिंदे,
प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र.

(हा लेख सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी...)

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...