वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती आयोजित शिवमहोत्सव 2021 च्या उद्घाटन समारंभ आज लाल महालात संपन्न झाला. अतिरिक्त जिल्हाधिकारी मा.विजयसिंह देशमुख साहेब, मा.महापौर दिपकभाऊ मानकर यांच्या शुभहस्ते लाल महाल पूजनाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. मराठा सेवा संघाचे प्रवक्ते मा.गंगाधर बनबरे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान संपन्न झाले..
कु. स्नेहल जाधव पायगुडे यांनी छत्रपती शिवरायांवर मर्दाणी पोवाडा सादर केला. सूत्रसंचालन विराज तावरे यांनी केले. आभार प्रशांत धुमाळ यांनी मानले. राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले, निलेश इंगवले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन जोशी, रोहित ढमाले, मंदार बहिरट, रोहित तेलंग, संतोष पायगुडे यांनी सहकार्य केले.
दुरुस्तीसाठी गेली पाच वर्षे लाल महाल सामान्य शिवप्रेमींसाठी बंद होता. संभाजी ब्रिगेडच्या पाठपुराव्यामुळे लाल महाल आता सर्वसामान्य शिवप्रेमींसाठी खुला झालाय. आज शिवकालीन शस्त्र, शिवकालीन वेशभूषा व गडकोट किल्यांच्या फोटोचे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन पुढील पाच दिवस खुले असेल. यावेळी बोलतांना समितीचे संस्थापक अध्यक्ष विकास पासलकर म्हणाले छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यातील आदर्शवत काम उभे केले रयतेला मदतीचा हात दिला. छत्रपती शिवरायांनी स्वराज्यातील सर्वसामान्य मावळ्यांची काळजी घेतली व लढवय्या मावळ्यांचा व स्वराज्यासाठी त्याग, समर्पण, सर्वस्व पणाला लावणाऱ्या व शिवराज्य निर्माण करणाऱ्या सन्माननीय व्यक्तीना राष्ट्रमाता जिजाऊंनी लाल महालात बोलावून गौरव केल्याचे दाखले आपल्याला इतिहासात मिळतात. छत्रपती शिवराय आणि राष्ट्रमाता जिजाऊना प्रेरणास्थान माणून आम्ही अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून अखंड कार्यरत आहोत.
समितीच्या माध्यमातून आम्ही गेल्या दहा वर्षांपासून छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव लाल महाल पुणे येथे विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवजयंती, 'शिवमहोत्सव’ म्हणून साजरा करत आहोत. ‘आखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या’ वतीने आम्ही शिवभक्तांना हे आवतन देत आहोत सर्वांनी वेळ काढून यावे ही विनंती....
शिवमहोत्सव'2021 आज दि. १३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या काळात लाल महाल, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. रोज सायंकाळी सहा वाजता विविध सामाजिक उपक्रम लाल महालात साजरे होणार आहेत. तरी आपण आपल्या सर्व स्नेही व सहकुटुंब उपस्थित राहावे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...