वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
ग्रा.पं.सदस्यांची मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार
गोंडपिपरी ( प्रतिनिधी ) : कोरोनामूळे खेडोपाडी मृत्यूंचे तांडव वाढू लागले असतांना सर्वत्र एकच धडकी भरली होती. अश्यावेळी राज्यसरकारने "ब्रेक द चेन" अंतर्गत लाॕकडाऊन सुरू केला. अन राज्यभर संचारबंदी लागू केली. ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर निर्बंध लादले. याचे फलित म्हणून आता संक्रणनाचा आकडा ओसरु लागल्याचे चित्र आहे. या धिरगंभिर काळात मात्र गावची "संसद" असलेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभा तालुक्यात "झूम अॕप"च्या माध्यमातून होत राहिल्या. असे असतांना गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर ग्रामपंचायत याला अपवाद ठरली आहे. या ग्रामपंचायतीच्या लगतच्या दोन महिण्याच्या मासिक सभा झाल्याच नाहीत. यामूळे गावचा विकास थांबल्याचा आरोप विरोधी बाकावरील ग्रा.पं.सदस्यांनी केला आहे. ऐन कोरोना संक्रमणाच्या धिरगंभिर काळात मासिक सभा न घेता गावच्या विकासाला "ब्रेक" लावणाऱ्या सरपंच, सचिवावर कार्यवाहीची मागणी होत आहे.
आक्सापूर ग्रामपंचायतीच्या तब्बल दोन महिण्याच्या मासिक सभा झाल्या नाहीत. यामूळे गावात बरिच कामे थांबली. कोठलेच नियोजन देखिल झालेले नाही. यामूळे कोरोनाच्या या गंभिर काळात मासिक सभा न घेता कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरपंच, सचिवावर कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे : महेंद्र कुनघाडकर, सदस्य, ग्रा.पं.आक्सापूर.
गोंडपिपरी तालुक्यात दूसऱ्या टप्यातील ४३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जानेवारी महिण्यात आटोपल्या. या निवडणूकींपुर्वी तालुक्यातील ग्रामपंचायतीवर तब्बल ६-७ महिणे प्रशासकांनी कारभार पाहिला. यादरम्यान गावातील विकासकामे थांबली होती. यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या.अन नव्या कारभारऱ्यांनी सुत्रे हाती घेतली. आता तरी गावचा विकासरथ पुर्ववत चालेल, असा आश्यावाद असतांना गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूरवासीयांची घोर निराशा झाली. या गावात एप्रिल आणि मे अश्या तब्बल दोन महिण्यात मासिक सभा झाल्याच नसल्याची गंभिर बाब समोर आली आहे. यामूळे ऐन कोरोना संक्रमणाच्या धिरगंभिर काळात कोरोना दक्षता समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या सरपंचानी शासनाच्या आदेशाला बगल दिली. ऐवढेच नाही तर मासिक सभा न घेता गावात मान्सूनपूर्व उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले. यामूळे गावच्या विकासाप्रती नकारात्मक असणाऱ्या सरपंच, सचिवांच्या चूकिच्या नियोजनाचा फटका आता आक्सापूरकरांना सोसावा लागणार असल्याचा आरोप ग्रामपंचायतील विरोधी बाकावरिल ग्रा.पं.सदस्यांनी केला आहे. याउलट तालुक्यातील ईतर ग्रामपंचायतीने कोरोना संक्रमणाच्या काळात मासिक सभा घेऊन वेळीच नियोजन केले. परिणामी कोरोनाला गावाबाहेर रोखले. त्यांना गावागावात मान्सूनपुर्व उपाययोजना करता आल्या. मात्र आक्सापूरात मासिक सभेअभावी कोठलेच नियोजन झाले नसल्याने गाव विकासकामांत पिछाडीवर असल्याचा आरोप होत आहे. आक्सापूरात कोविडच्या लसिकरणाबाबत नागरिक उदासिन असल्याचा प्रत्यय तालुका प्रशासनाला येत आहे. गावात मलमा उपसण्याचे अद्याप कोठलेच नियोजन झालेले नाही. पाणि पुरवठा योजनेचे काम अत्यंत निकृष्ठ झाल्याने ८६ लक्ष रुपये "पाण्यात" गेले आहेत. अश्या एक ना अनेक समस्या आता आवासून उभ्या आहेत. यामूळे मासिक सभा न घेता कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरपंचास अपात्र तर सचिवावर कार्यवाहीची मागणी विरोधी बाकावरिल सदस्यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गोंडपिपरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना दिले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...