Home / चंद्रपूर - जिल्हा / शेतीवर आधारित उद्योजकता...

चंद्रपूर - जिल्हा

शेतीवर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

शेतीवर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर:  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतींकरीता दि. 18 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत ऑनलाईन  शेतीवर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सदर ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये शेतीवर आधारित विविध उद्योग संधी, अन्न प्रक्रियांवर आधारित उद्योग संधी, डिजिटल मार्केटिंग, अॅग्रीकल्चर प्रोडक्ट पॅकेजिंग, दुग्ध व्यवसाय व दुग्ध प्रक्रिया, फळ प्रक्रिया, पशुसंवर्धनावर आधारित उद्योग संधी, उद्योजकता व उद्योजकांचे गुण, उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, संभाषण कौशल्य, संकलन व आकलन कौशल्य, सर्जनशीलता, नाविन्यपूर्तता व समस्या निराकरण, संघटनांचे प्रकार, शासकीय कार्यालयातील विविध योजना, बाजारपेठ पाहणी, साधने व तंत्रज्ञान, उत्पादन निवड, उद्योगासाठी लागणारे परवाने, ना-हरकत प्रमाणपत्र व नोंदणी, जीएसटी नोंदणी, उद्योगाचे व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, उत्पादन व कच्चा माल यांचे व्यवस्थापन, उत्पादन नियंत्रण व नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, खेळते भांडवल व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, ऑनलाइन कर्ज प्रक्रिया व कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करणे इत्यादी विषयांवर ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या ठिकाणी करा अर्ज:

सदर प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी  www.mced.co.in या वेबसाईटवर  दि. 17 जून 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.

येथे साधा संपर्क:

अधिक माहितीसाठी  प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोड, दुरध्वनी क्रमांक 07172-274416, 9403078773 व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे 9011667717, लक्ष्मी खोब्रागडे 9309574045 यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...