Home / महाराष्ट्र / ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना...

महाराष्ट्र

ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना रोखण्यासाठी आमदारकीच्या चिटूऱ्या वाटत आहेत हे तर चिटूरे आमदार म्हणत मिटकरी च्या गावात ठोकला पँथर दणका !

ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना रोखण्यासाठी आमदारकीच्या चिटूऱ्या वाटत आहेत हे तर चिटूरे आमदार म्हणत मिटकरी च्या गावात ठोकला पँथर दणका !

ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना रोखण्यासाठी आमदारकीच्या चिटूऱ्या वाटत आहेत हे तर चिटूरे आमदार म्हणत मिटकरी च्या गावात ठोकला पँथर दणका!

भारतीय वार्ता (प्रतिनिधी):  आज थेट आमदार अमोल मिटकरीच्या गावात ऑल इंडिया पँथर सेनेची शाखा स्थापन झाली. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील कुटासा गावात जोरदार एन्ट्री केली. हजारो भिमसैनिकानी एकच जल्लोष केला. गावात मिरवणूक काढून घोषणांनी परिसर दणाणून टाकला. जंगी स्वागत झालं यावेळी त्यांनी शाखेचं उदघाटन करून शाखा स्थापन केली. 
रैलीचं रूपांतर जाहीर सभेत झालं, यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं, चिटूऱ्या आमदार झाला अन फुले, शाहू, आंबेडकरांना विसरला तेंव्हा म्हटलं गांडीला पाय पोहोचले का? आमचे बाप शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज बारामतीचा आमचा बाप होऊच शकत नाही. बाळासाहेबांना रोखण्यासाठी आमदारकीच्या चिटूऱ्या वाटल्या जात आहेत. आधी या फकड्या दिपक केदारला भिडा असेही आवाहन यावेळी त्यांनी केले. वंचितच्या सिलेंडर च्या दणक्याने आमदारक्या वाटायला निघालेत. आता सत्ता ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. शेतकरी, कामगार, बहुजनांच्या मुळावर उठलेले हे सरकार आहे. एक जात घराणेशाही चा विकास हाच त्यांचा अजेंडा आहे.   कोरोनाच्या नावाखाली वीज कट केली जाते जो वीज कट करायला येईल त्याला ठोकून काढा पुढची पुढे बघू. मजुरांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे आपल्या पायात एवढी धमक ठेवा ताकद ठेवा की सत्ताधाऱ्यांच्या कंबरेत जोरात घालता आली पाहिजे. 
आम्हाला कोरोना होत नाही, कारण आमचं पोट उपाशी आहे. ज्यांच्या पोटाची खळगी भरलेली नाही, त्यांना कोरोना होत नाही, येते कोरोना त्यालाच होतो ज्यांचं पोट भरलेलं आहे नाही त्याला जगायचं आहे. आमची उपासमारीने जगण्याचा भरोसा नाही त्यामुळे आम्हाला कोरोना होत नाही.
100 कोटी वसूल करा म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे होती की ही लोकशाही जनतेच्या रक्ताच्या घामाच्या पैशातून चालते. लोकशाहीचा लोकप्रतिनिधी जबाबदार अंग आहे त्याला लोकांच्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी बसवलेले असते परन्तु येते तर लूटमार सुरू आहे. त्यामुळे असल्या भ्रष्टवादी, खुनवादी, चोरवादी, डाकावादी पक्षाचं निवडणूक चिन्ह रद्द केलं पाहिजे ही आमची भूमिका आहे.
तीन तिघाडी आणि काम बिघाडी अशी अवस्था आज झाली आहे. एक म्हणतो मला माफ करू वाटतंय, दुसरा म्हणतो माझ्याकडे पैसे नाहीत तर तिसरा म्हणतो मला काही माहीत नाही. नुसता तमाशा सुरू आहे कुणाच्या गळ्यात ढोलकी कुणाच्या पायात घुंगरू नुसता तमाशा सुरू आहे. वांझे फाझे अंबानी फिम्बनी यात लोकांना रस नाही. 20 कांड्या ठेवतंय कोण, कुणाचा मुक्का घेतंय कोण, कुणाचा खेळ बिघडवायचा कुणाला सत्ता हवी आहे,  कुणाची सेटिंग कुठे सुरू आहे हे सगळं महाराष्ट्र ओळखून आहे.
देवेंद्र फडणवीस रोज गंभीर आरोप करत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता गप्प कशा काय? का बरं येते एकही कार्यालय फुटलं नाही? ही सेटिंग म्हणजे बी टीम आहे. भाजपच्या मांडीवर बसण्याची घाई सुरू झाली आहे, केंद्राच्या मलिद्यावर लक्ष आहे हे सगळं आम्हाला कळतं.
आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या सुद्धा येत नाही. कामगार फाशी घेतोय, बहुजन फाशी घेतोय. याना अंबानीच्या घराच्या रक्षणाचं पडलं आहे. समग्र क्रांती अन राजकीय क्रांती बदल हाच आजचा पर्याय आहे.
शिवजयंती दणक्यात साजरी केली आता भीमजयंती सुद्धा दणक्यात साजरी करणार. आमच्या बापाला अभिवादन कसं करायचं हे शिकू नये, शेंड्यानी तर शिकूच नये. त्यामुळे कामाला लागा बिनधास्त भीमजयंती साजरी करा.
कोरोनाच्या नावाखाली गुलामगिरी येईल त्यामुळे यांना वाटत कोरोना म्हटलं की हे घाबरतील परन्तु ऑल इंडिया पँथर सेना एकमेव अशी संघटना आहे जिने हजारोचा मोर्चा या महारष्ट्रात काढला. सगळ्या पक्षांनी गांडीत शेपूट घालून बसण्याचं काम केलं आम्ही लढत आहोत लढत राहू. हा माणूस वाचवण्याचा संघर्ष तीव्र करू. 
खाजगिकरणातून आमचं आरक्षण संपेल, येते आरक्षण संपवायला बसलेलेच आहेत. सगळं विकलं जात आहे, धर्म महत्वाचा झाला आहे माणूस पुन्हा एकदा या धर्मापुढे हरत चालला आहे ही धर्मची व्यवस्था उद्धवस्त करणं हाच आमच्यापुढे पर्याय आहे. 
      अशी अनेक मुद्दे घेऊन कुटासा गावात पँथर दणका देण्यात आला... यावेळी कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा अध्यक्ष अंकुश तायडे , महिला अध्यक्ष निरंजनी कांबळे , महासचिव सागर सोनुने , उपाध्यक्ष संदिप दामोदर, ता.अध्यक्ष मंगेश दामोदर , ता.उपाध्यक्ष दिलीप खडे , ता.सचिव सुधीर देशमुख , ता.सघटक सागर वाहुरवाघ , पंजाब धांडे , देवानंद इंगळे आणि हजारो च्या संख्येत असलेले ऑल इंडिया पँथर सेनेचे कार्यकर्ते हजर होते.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...