वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची अतिंम मुदत 25 सप्टेंबरपर्यंत
चंद्रपूर: दि. 15 सप्टेंबर : आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित इंग्रजी माध्यमाच्या सर्व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मधील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6वी च्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता 7 ते 9 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता अनुसूचित, आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. त्याकरीता https://admission.emrsmaharashtra.com ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी दिलेल्या लिंकवर आवेदनपत्र ऑनलाईन भरुन त्यासोबत मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावयाचे आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता अर्जदार विद्यार्थ्याचा सरल पोर्टलवरील विद्यार्थी आयडी व मोबाईल क्रमांक (ओटीपी करिता) आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याबाबतची सविस्तर माहिती लिंकवर देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत दि. 25 सप्टेंबर 2021 पर्यंत असणार आहे.
तरी अनुसूचित, आदिम जमातीच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा येथील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, चिमूर येथे संपर्क करावा. असे आवाहन चिमूर, आदिवासी विकास विभागाचे, प्रकल्प अधिकारी के.ई. बावनकर यांनी केले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...