Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / ब्रम्हपूरी व सिंदेवाही...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

ब्रम्हपूरी व सिंदेवाही पंचायत समितीच्या इमारत बांधकामासाठी 25 कोटींची प्रशासकीय मान्यता

ब्रम्हपूरी व सिंदेवाही पंचायत समितीच्या इमारत बांधकामासाठी 25 कोटींची प्रशासकीय मान्यता

पालकमंत्री विजय वडेट्टीवारांच्या पाठपुराव्याला यश

चंद्रपूर दि. 22 सप्टेंबर : ब्रम्हपूरी व सिंदेवाही येथील पंचायत समितीची इमारत जुनी झाली असून अशा परिस्थितीत तेथे काम करणे गैरसोयीचे आहे. त्यामुळे या दोन्ही पंचायत समितीच्या इमारतींचे नवीन बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले होते. सदर प्रस्ताव शासनाकडे प्राप्त होताच पालकमंत्र्यांनी त्याचा सतत पाठपुरावा  केला. त्यांच्या प्रयत्नाला यश आले दोन्ही इमारतींच्या बांधकामासाठी 25 कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

ब्रम्हपूरी येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास 12 कोटी 45 लक्ष 19 रुपये तर सिंदेवाही येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास 12 कोटी 36 लक्ष 42 हजार रुपयाच्या अंदाजपत्रकीय कामास ग्रामविकास विभागाने 20 सप्टेंबरच्या आदेशान्वये निधीसह प्रशासकीय मान्यता दिली आहे. दोन्ही ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा पालकमंत्र्यांचा मानस आहे.

ब्रम्हपूरी व सिंदेवाही येथील पंचायत समितीची इमारती 1958 साली बांधली होती. सदर इमारतीचे बांधकाम जीर्ण झाल्यामूळे व सदर इमारत ही प्रशासकीय कामाच्या दृष्टीने अपुरी असल्याने कामकाजाच्या दृष्टीने गैरसोयीची आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे आवश्यक होते. त्यामुळे विजय वडेटटीवार यांनी कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना अंदाजपत्रकासह प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्यानुसार कार्यकारी अभियंता यांनी रितसर प्रस्ताव तयार करून सन 2017 मध्ये शासनाकडे पाठविला होता.

या दोन्ही कामास प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याचे बघून श्री. वडेटटीवार यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्न, लक्षेवधी आदी माध्यमातून तत्कालीन शासनाचे लक्ष वेधले होते. तरीसुध्दा या कामास त्यावेळेस मान्यता मिळालेली नव्हती. राज्यात नवीन सरकार स्थापन होताच श्री. वडेट्टीवार यांनी दोन्ही पंचायती समितीच्या इमारत बांधकाम करण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले असून ब्रम्हपूरी व सिंदेवाही येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.

ब्रम्हपूरी आणि सिंदेवाही या दोन्ही पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामामध्ये  तळमजल्याचे बांधकाम 80.67 चौ.मी, पहिल्या मजल्याचे 485.34 चौ.मी., दुस-या मजल्याचे 485.34 चौ.मी. असे प्रत्येकी एकूण 1051.35 चौ.मी. बांधकामाचा समावेश आहे. यामध्ये ग्रीन बिल्डींग संकल्पना अंमलात येणार आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी कृतीबध्द विकास आराखडा तयार करण्यात आला असून करोडो रूपयांची विकासकामे सुरू आहेत तर काही कामे लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली.

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...