Home / चंद्रपूर - जिल्हा / नायलॉन मांजा निर्मिती,...

चंद्रपूर - जिल्हा

नायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर होणार कार्यवाही

नायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर होणार कार्यवाही

चंद्रपूर, दि. 6 जानेवारी : मकर संक्रांतीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिकांकडून उडविण्यात येणाऱ्या पतंगाकरिता वापरण्यात येणारा मांजा (दोरा) हा नायलॉन स्वरूपाचा असतो. मकर संक्रांतीच्या अगोदर व नंतर काही दिवस पतंग उडविण्याचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी नायलॉन मांजा (दोरा) या धाग्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तसेच या मांजामुळे मानवी जीवितास, पशु-पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण होऊन जखमी व मृत होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग यांच्या परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यात नायलॉन मांजाचा वापर, विक्री व निर्मिती करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(2) अन्वये संपुर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात नायलॉन मांजाच्या वापरामुळे मानव, पशू-पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून दि. 5 जानेवारी ते 25 जानेवारी 2022 पर्यंत पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा याची निर्मिती विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात येत आहे.

या आदेशाची कडक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने महानगरपालिका क्षेत्रात मनपा आयुक्त, नगरपरिषद, पंचायत क्षेत्रात संबंधित मुख्याधिकारी आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत प्रशासन यांनी त्यांच्या क्षेत्रात नायलॉन मांजाची निर्मिती, वापर व विक्री न होण्याच्या दृष्टीने शोध पथके स्थापन करावीत व सदर पथकामार्फत ज्या व्यक्तीकडून नायलॉन मांजाची विक्री, वापर व निर्मिती होत असेल त्यांच्यावर नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशात नमूद आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...