Home / चंद्रपूर - जिल्हा / तंबाखू व तंबाखूजन्य...

चंद्रपूर - जिल्हा

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्यांतर्गत 26 पानठेल्यांवर कारवाई

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्यांतर्गत 26 पानठेल्यांवर कारवाई

अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात धडक मोहीम

उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात 26 पानठेल्यांवर कारवाई करण्यात आली. कोटपा कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली.

जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत आरोग्य विभाग, अन्न  व औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस विभागामार्फत शासकीय कार्यालये, हॉस्पिटल, शाळा परिसरातील पानठेल्यावर सदर कार्यवाही  करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांना तंबाखुमूळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती व जाणीव होईल. तसेच नवीन पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही, हा उद्देश सफल होईल. कोटपा कायदा 2003 ची अंमलबजावणी तसेच जास्तीत जास्त लोकांना यांच्या दुष्परिणामाची जाणीव होणे हासुध्दा या कारवाईचा उद्देश आहे. यावेळी “ करा तंबाखू, सिगारेट, जर्दा  याला  नकार, करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार ” हा कानमंत्र देण्यात आला. सदर कार्यवाहीमध्ये जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर, अन्न निरीक्षक श्री. सातकर , पोलीस निरीक्षक श्री. अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. चव्हाण तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत येणारे समुपदेशक मित्रंजय निरंजने, सामाजिक कार्यकर्ता तुषार रायपुरे, अतुल शेंद्रे, दुर्गाप्रसाद बनकर यांनी मोलाची कामगिरी केली

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...