वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर दिनांक 22 नोव्हेंबर : कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोविड लसीकरणाकडे बघितले जाते. परंतु अद्यापही नागरिकांमध्ये कोविड लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. काही तालुक्यांमध्ये नागरिकांचे लसीकरण अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित जिल्हा टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, नगर प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके, हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
काही तालुक्यात अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, गावनिहाय सुक्ष्म नियोजन करून लस न घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे, दिलेले लक्ष समोर ठेवून कामे करावीत. तालुका व गावनिहाय अजून किती लाभार्थी लसीकरणासाठी शिल्लक आहेत, याची माहिती घ्यावी. शिल्लक असलेल्या नागरिकांची यादी तयार करावी. जिल्हा प्रशासनाद्वारे ‘हर घर दस्तक’ ही मोहिम राबविली जात आहे. त्या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या दारापर्यंत आरोग्य कर्मचारी गेलेत का याची माहिती घ्यावी, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री.गुल्हाने पुढे म्हणाले, शेतीचा हंगाम असल्याने ग्रामीण भागातील नागरिक सकाळच्या सुमारास शेतात निघून जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे वेळेत लसीकरण व्हावे यासाठी सकाळी 8 वाजता लसीकरण केंद्र सुरू झाले पाहिजे. नेमून दिलेले संपर्क अधिकारी व पालक अधिकाऱ्यांनी लसीकरण केंद्राला नियमीत भेट द्यावी. लसीकरण केंद्रावरील लसीचा मुबलक साठा, लसीकरण करणारे कर्मचारी याबाबत माहिती घ्यावी. त्यासोबतच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत लसीकरणास प्रोत्साहित करावे. तालुक्यातील उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांनी लसीकरणासंदर्भात नियमित आढावा घ्यावा. तसेच सकाळी लसीकरण केंद्राला भेट द्यावी.
पालक अधिकारी, नोडल अधिकारी वेळेत पोहोचतात का, लसीकरण केंद्र सकाळी नियमित उघडतात का आदींची याची खात्री करावी. प्रत्येक गटविकास अधिकारी यांना लसीकरणासाठी गावे नेमून द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या. येत्या 24 नोव्हेंबरपासून स्वत: तालुक्यातील लसीकरण केंद्राला भेट देणार असून यावेळी कार्य दिसत नसल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करणार असल्याचेही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले.
21 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात 13 लक्ष 80 हजार 237 नागरीकांचा पहिला डोज तर 5 लक्ष 33 हजार 196 नागरिकांचे दोन्ही डोज असे एकूण 19 लक्ष 13 हजार 433 डोज देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदीप गेडाम यांनी उपस्थितांना दिली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याशी व्हिसीद्वारे संवाद साधून तालुकानिहाय लसीकरणाचा आढावा घेतला.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...