वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) :- पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथील मौजा चांदगांव शेतशिवारात दि . २३/०८/२०१८ रोजी मृतक सौ . इंदुबाई ईश्वर कुथे वय ४५ वर्षे हिला तिचा पती फिर्यादी ईश्वर महादेव कुथे वय महादेव कुथे वय ५२ वर्ष रा . टिळकनगर ब्रम्हपुरी याने चांदगांव शेतशिवारातील त्याचे शेतात तुरीचा कचरा साफ करणेकरीता सकाळी १०:०० वा.चे सुमारास सोडले होते . सायंकाळी अंदाजे ०५:०० वा. चे दरम्यान मृतक चा पती फिर्यादी ईश्वर कुथे हा तिला घेण्यासाठी शेतात गेला असता ती जखमी अवस्थेत पडलेली दिसली.तिला ग्रामीण रूग्णालय ब्रम्हपुरी येथे नेले असता ती मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषीत केले होते . फिर्यादी ईश्वर महादेव कुथे याने तिच्या पत्नीला कोणीतरी अज्ञात ईसमाने शस्त्राने वार करून मारले अशा फिर्यादी ईश्वर कुथे याने दिलेल्या रिपोर्ट वरून पोस्टे ब्रम्हपुरी येथे दि . २४/०८/२०१८ रोजी अप क . ७४८/२०१८ कलम ३०२ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता .
सदर गुन्हयातील आरोपी हा मृतकचा पती फिर्यादी ईश्वर महादेव कुथे वय ५२ वर्ष रा . टिळकनगर ब्रम्हपुरी हाच असल्याचे निष्पन्न करून त्याचेविरूद्ध दोषारोप पत्र दाखल करून सदर गुन्हयाच्या खटल्याची सुनवाई मा . जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपुर येथे सुरू होती . आज दि . ०३/०८/२०२१ रोजी मा . जिल्हा व सत्र न्यायालय यांनी सदर अप क . ७४८/२०१८ कलम ३०२ भादवी , केस क . ८२/२०१८ मध्ये निकाल पारीत करून आरोपी ईश्वर महादेव कुथे वय ५२ वर्ष रा . टिळकनगर ब्रम्हपुरी याला जन्मठेप व १००० / - रू दंड ईतकी शिक्षा सेशन कोर्ट चंद्रपूर येथे सुनावण्यात आली . स.पो.नि श्री रघुनाथ कडके यांनी सदर गुन्हयाचा तपास करून आरोपीविरूदध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते . सदर गुन्हयाचे खटल्यात जिल्हा सरकारी वकिल श्री पी.जी. घटुवार यांनी सरकारची बाजु मांडली तर कोर्ट पैरवी म्हणुन पो.हवा , रामदास कोरे ब.न. ४१४ यांनी कामकाज पाहीले .
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...