*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (प्रतिनिधी) : शिरपूर स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या बेल्लोरा येथील खाजगी सुरक्षा रक्षकांचा सायकलने कर्तव्य करण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातात उपचारा दरम्यान मृत झाल्याची घटना घडली असून अपघात झाला तर कसा हा प्रश्न गावकऱ्यांना सतावत आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की, दि.4 मार्च रोजीच्या सायंकाळी प्रमोद राजाराम ब्राह्मणे (57) मु. बेलोरा हे उकणी खुल्या खदानी अंतर्गत येत असलेल्या खाजगी सुरक्षा रक्षक पदी काम करण्यासाठी बेल्लोरा येथून सायं 6-00 वाजे दरम्यान गावातून सायकलने कर्तव्यावर निघाला असता तो 7-00 वाजे दरम्यान सायकल सह बेल्लोरा बस स्टॉप जवळ खाली पडून होते. काही वेळानंतर बेलोरा गावातील अंकुश पाचभाई व अभय बर्डे या तरुणांना दिसले असता त्यांनी ओळख लक्षात घेऊन प्रमोदला गावात आणून घरच्यांना माहिती देऊन त्यांना गावातील उपचारा करता डॉ. खुटेमाटे यांच्या कडून जखमेची तीव्रता लक्षात घेऊन प्रमोदला गावातील खाजगी वाहनाने डॉ. कोल्हे (घुगुस ) यांच्याकडे रवानगी केले, तेथेही उपचार करणे शक्य नसल्याने चंद्रपूर येथे रवानगी केले. पण जखमीची तीव्रता जास्त प्रमाणात असल्याने तेथूनही नागपूर करिता रवानगी केले असता अचानक प्रमोदची तबियत भद्रावती येथे पोहचत नाही तेव्हाच अचानक जास्तच झाली असता त्यांना भद्रावती ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता उपचारा दरम्यान मृत घोषित केले, यावेळी पत्नी अर्चना यांनी गोंधळी स्थितीत प्रमोदवर त्याच रुग्णालयात उत्तर वाहनी न करता बेलोरा येथे घेऊन आल्या. त्यावेळी सायंकाळचे 4-00 वाजले असता ही माहिती आप्तसकीयांना प्राप्त झाली असता घटना व वास्तवता लक्षात घेऊन पोलीस स्टेशन शिरपूर येते जाऊन घटनेची फिर्याद मयतेची भाची सौ. मयुरी संतोष वाघमारे (33) मु. पूरड यांनी दिली असून फिर्याद घेण्यास पोलीस यांच्या कडून दिरंगाई समोर आल्याने विलंबनाचे कारण समोर आले आहे, घटना झाली तर कशी हा शोध घेणे पोलीसाची डोके दुःखी ठरणार असे चित्र निर्माण झाले.
कुटूंबातील करता करविता जीव गेला असला तरी इतर लाभ व कोरोना संकट लक्षात घेऊन परिवाराने वणी येथे उत्तर वाहनी करून बेलोरा गावी सायंकाळी 6-00 वाजे दरम्यान अंतिम संस्कार करण्यात आले. जीव गेल्यावर न्याय कोणाला द्यायचा हा संदेश मात्र घटनेवरून समोर आला आहे. त्यांच्या पच्छात तीन मुली, पत्नी व नातवंडे असा आप्त परिवार आहे, तर समोरील तपास ठाणेदार सचिन लुले पाटील यांच्या मार्गदर्शना खाली जमदार प्रमोद जुनूनकर करीत आहे.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...