वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): जिल्ह्यात गेल्या ३० वर्षात घुग्घुस जवळील एसीसी कंपनीने लाईनस्टोनच्या अवैध उत्खनन व ओव्हरलोडच्या माध्यमातून करोडो रुपयांचा महसूल बुडविलेला असून , परिसरातील शेतमालाचे, नागरिकांच्या आरोग्याच्या नुकसानीबद्दल व भ्रष्ट व्यवहाराबाबत कंपनीवर सी. बी. आय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधान भवनात तारांकित प्रश्नावर चर्चेदरम्यान आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस जवळील एसीसी कंपनीने सन २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षात सिंदोला लाईमस्ट्रोन खाणीत उत्खननाचे प्रस्तावित प्रमाण २९ लाख ८७ हजार ९२८ टन आहे. सध्या २३ लाख ९१ हजार ३९६ टन व भरलेली रॉयल्टी १९ करोड १३ लाख ११ हजार ६८० रुपये याप्रमाणे अधिकाऱ्यांनी आकडेवारी दिली आहे. परंतु हि प्रत्यक्षात आकडेवारी दिशाभूल करणारी असून मागील ५ वर्षात १०० लाख टन असून या गंभीर प्रकरणाची सी. बी. आय मार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग असून येथील उद्योगांना पाठीशी घालण्याचे काम येथील अधिकारी करीत आहेत. जिल्ह्यात लाईमस्टोनच्या अवैध उत्खनन व ओव्हरलोडच्या माध्यमातून करोडो रुपयांचा महसूल बुडविलेला असून , परिसरातील शेतमालाचे नुकसान तसेच नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असून देखील मंत्री महोदयांना चुकीची माहिती येथील अधिकाऱ्यांनी पुरविली आहे.अधिकाऱ्यांनी जी आकडेवारी दिली, ती वास्तविकता नसून संबंधित कंपनीबाबत अनेकदा पत्रव्यवहार, बैठकीची मागणी, मार्गदर्शन व कार्यवाही याबाबत लक्ष वेधण्यात आले. तरीदेखील नातेगोते जपण्याच्या नादात या गंभीर बाबीकडे दूर केले जात असल्याची खंत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...