*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
वणी (विभागीय-प्रतिनिधी ) : वणी नगर सेवा समितीचे मार्गदर्शक स्व.श्री.गुलाबराव खुसपुरे काकाजींचे स्मृतीस अभिवादन पर 100 वृक्षांची लागवड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात करून व त्या सर्व वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संपूर्ण वणी नगरी व परिसराला पुर्णत : हरित करण्याचा ध्यास घेऊन व ते स्वप्न उराशी बाळगून अनेक वर्षापासुन वणी शहरात वृक्षारोपणच नाही तर त्यांचे संगोपन करण्याचे ध्येय घेऊन सदर परिसर हिरवागार करण्यात येत आहे.वणी नगरीतील भव्य परिसर असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे हा उपक्रम राबविण्यात आला .यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ह.भ.प.श्री . मनुमहाराज तुगनायत यांची उपस्थिती होती व मा .प्रा.श्री .सुरेशजी चोपणे , पर्यावरण अभ्यासक ग्रीनप्लानेट सोसायटी अध्यक्ष , केंद्रीय पर्यावरण ,वने हवामान बदल मंत्रालयाच्या क्षेत्रीय सशक्त समिती सदस्य तसेच खुसपूरे परिवारासह शहरातील प्रतिष्ठीत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले .
वृक्षारोपनानंतर घेण्यात आलेल्या सभेत नगर सेवा समितीचे संस्थापक श्री दिलिपजी कोरपेनवार सर यांनी प्रास्ताविकेतून या संस्थेचे कार्य , मानस व प्रत्यक्षात झालेल्या कार्यावर प्रकाशझोत टाकला तसेच श्री खुसपुरे काका व नगर सेवा सेवा समितीचे ऋणानुबंध- नाचे , कार्याचे व अमूल्य योगदानाचे महत्व विषद करण्यात आले . मा . प्रा . श्री . सुरेशजी चोपणे यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून , सृष्टीतील प्रत्येक सजीवाचे मानवी जीवनातील परस्परपूरकता यांचे महत्त्व याबाबत सोप्या उदाहरणांमधून महत्वाची माहिती दिली.वने व सृष्टीतील घटकांचा -हास हेच या महामारीस कारणीभूत असल्याचे सांगितले . व वनांचे महत्व पटवून दिले , अध्यक्षीय मनोगतातून मनू महाराज यांनी श्री गुलाबराव खुसपुरे काकाजींचे विविध कार्याचे सामाजिक , सांस्कृतिक , आध्यात्मिक, पर्यावरणविषयक परिचय देऊन , श्री कोरपेनवार सर व नगर सेवा समितीने केलेल्या वृक्ष लागवड व संगोपन कार्यामुळे झालेले फायदे विषद केले यावळी श्री राजू पिंपळकर , . श्री.प्रभाकर बल्की सर , श्री . राजेश खुसपुरे यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी .मा. *श्री.अरुण कावडकर साहेब , मा . सौ.वर्षा राजेश खूसपुरे नगरसेविका नगरपरिषद वणी उपास्थित होते .कार्यक्रमाचे संचलन, प्रास्तविक श्री दिलिप कोरपेनवार सर . संस्थापक नगर सेवा समिती यांनी केले आभार प्रदर्शन श्री राजू पिंपळकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री.मनिषजी कोंडावार श्री सागर जाधव व स्माईल फाउंडेशनची संपूर्ण टीम,आय.टी.आय.तील सर्व अध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...