वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
सोमवार, दि. २२ नोव्हेंबर(घुग्घुस): भाजपचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा वाढदिवस जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, वाढदिवसानिमित्त मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शक कार्यपद्धतीला साजेसे उपक्रम राबविण्यात आले ,प्रामुख्याने यामध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये तब्बल १७५३ रक्तदात्यांनी रविवारी रक्तदान केले. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदान करून रक्तदात्यांनी चंद्रपूर जिल्ह्यासाठी रक्तदानाचा हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
देवराव दादा भोंगळे मित्रपरिवार तसेच शासकीय रक्तपेढी अमरावती, अहेरी, चंद्रपूर आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील घुग्घुस, कोरपना, राजुरा, बल्लारपूर, जुनगाव, भद्रावती, चंदनखेडा व वरोरा येथे या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये, सतरा वर्षापासुन अविरत परंपरा चालवणार्या घुग्घुस शहरात सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या शिबीराचा शेवट रात्री नऊ वाजता शेवटच्या १०१९ व्या रक्तदात्याकडून झालेल्या रक्तदानाने झाला.
कोरपना येथे १२१, वरोरा येथे १०२, बल्लारपूर येथे ५२, भद्रावती येथे ३७, चंदनखेडा येथे ५१, जुनगाव येथे ७० रक्तदात्यांनी रक्तदान करून कोविड महामारीसारख्या कठीण काळात जो रक्ताचा तुटवडा झाला आहे त्याला आपल्यापरीने भरून काढण्यासाठी योगदान दिले.
राजूऱ्यात विविध पक्षसंघटनांच्या तसेच अराजकीय भाच्यांनी 'लाडक्या देवराव मामासाठी' प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले नाही, तर शहराच्या इतिहासात प्रथमच एका राजकीय नेत्याच्या वाढदिवशी तब्बल ३०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
चंद्रपूर शहरात उपमहापौर राहुल पावडे मित्रपरिवारातर्फे विविध योजनांचा मेळावा तथा आरोग्य तपासणी व एकदिवसीय लसीकरण शिबीर घेण्यात आले, याचा ७१३ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तसेच राष्ट्रवादीनगरात सुभाष कासनगोट्टूवार यांच्या पुढाकारातून १११ ई-श्रम कार्डचे वितरण, ७२ बांधकाम कामगारांच्या कार्डचे रीनिवल आणि ७६ नविन मतदारांची नोंदणी करण्यात आली. तसेच इंदिरानगर येथे आकाश मस्के मित्रपरिवाराने ४० उज्ज्वला गॅस कनेक्शनचे वाटप केले. तसेच प्रवीण उरकुडे यांचेमार्फत बगड खिडकी परिसरात ४० उज्ज्वला गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. यासोबतच लालपेठ परीसरातील शाळकरी मुलांना नोटबुक व पेनचे वाटप मित्रपरिवाराकडुन करण्यात आले.
तसेच भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने बल्लारपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात वृद्धांना भोजनदान तर जि. प. सदस्य राहूल संतोषवार यांनी देवाडा-केमारा जि. प. क्षेत्रात कोरोणा योद्ध्यांचा सत्कार केला. तसेच पं.स. सभापती अल्का आत्राम यांनी घनोटी व गंगापूर येथिल शालेय विद्यार्थ्यांना स्कुलबॅगचे वाटप केले.
याप्रसंगी जिल्ह्यात ठिकठिकाणी बोलताना, आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्याने जिल्हाभर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी व तसेच मित्रपरिवाराने असे महारक्तदानाचे व जनसेवेचे कार्यक्रम राबवून आजचा दिवस सेवामय केला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी रक्तदान पार पडले. कार्यकर्त्यांनी माझ्यावरील प्रेमापोटी मेहनत घेतली, माझ्या निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली त्याबद्दल मला सदैव तुमच्या ऋणात रहायला आवडेल.
राजूऱ्यामध्ये न भूतो असा रक्तदानाचा कार्यक्रम माझ्या सर्वपक्षीय भाच्यांनी घेतलाच नव्हे तर मोठ्या संख्येने रक्तदात्यांना त्यात सहभागी होत यशस्वी केला. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि आपणा सर्वांचे प्रेम, सहकार्य आणि साथ माझ्याबरोबर सदैव राहो अशीच प्रार्थना ईश्वरापाशी करतो. असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...