Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मुकुटबनचे ठाणेदार व...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मुकुटबनचे ठाणेदार व सहाय्यक फौजदाराने 50 हजार घेऊन चोरीचा खोटा गुन्हा केला दाखल.

मुकुटबनचे ठाणेदार व सहाय्यक फौजदाराने 50 हजार  घेऊन चोरीचा खोटा गुन्हा केला दाखल.
ads images

 पैसे घेतल्याचा ऑडिओ रेकॉर्डींग तक्रार कर्त्याजवळ उपलब्ध, सहाय्यक फौजदार, तत्कालीन रायटर व होमगार्ड यांची महत्वाची भूमिका.

आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) :  मुकुटबन पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी 50 हजार रुपये घेऊन चोरीचा खोटा गुन्हा दाखल केल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या सह वरिष्ठ अधिकारी यांना करून त्वरित निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 प्राप्त महितीनुसार मुकुटबन येथील रहिवासी असलेला दीपक उदकवार हा हॉटेल व्यावसायिक असून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांना रेतीची आवश्यकता होती. पाऊस सुरू असल्याने रेती मिळत नसल्याने त्यांच्या ड्रायवरला कुठे रेती मिळत असेल तर आणायला सांगितले. रेती घेऊन येत असताना येडशी गावाजवळ ठाणेदार धर्मा सोनुने व सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर यांनी पहाटे 6 वाजता ट्रॅक्टर पकडला व कोणताही पंचनामा न करता जप्त करून पोलीस स्टेशनला लावला. ट्रॅक्टर मालक दीपक उदकवार याला 9 वाजता पोलीस ठाण्यात बोलाविन्यात आले.पोलीस ठाण्यात दीपक उदकवार गेले असता तेथे ठाणेदार सोनुने  व सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर हजर होते. या दोघांनीही दीपक उदकवार याला  1 लाखाची मागणी केली व तू पैसे न दिल्यास तुझ्यावर चोरीचा गुन्हा दाखल करतो व महसूल विभागाकडे ट्रॅक्टर सोपवून दीड लाखाचे दंड ठोठावाला लावतो असे धमकावले.

जिल्हा पोलिस अधिक्षकासह वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार निलंबनाची कार्यवाही न केल्यास  कुटुंबीयासह  आमरण उपोषणचा दिला इशारा

1 लाख रुपयाच्या मागची तडजोड करण्याकरिता  12 वर्षांपासून मुकुटबन येथे असलेले तसेच ठाणेदार सोनुने यांचा तत्कालीन रायटर सुलभ उईके याने मोबाईलद्वारे दीपक याला फोन करून तसेच दबाव टाकून 1 लाखावरून 50 हजाराच्या रक्कमेची  दबाव टाकून मागणी केली व तडजोड झाली. कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी  50 हजार  देण्याचे कबूल झाले. ठाणेदार सोनुने व ऋषी ठाकूर यांनी 50 हजार आणण्याकरिता होमगार्ड निखिल मोहितकर याला दीपक यांच्या हॉटेल मध्ये पाठविले. होमगार्ड मोहितकर हा हॉटेल मध्ये जाऊन दीपक यांच्या पत्नी जवळून बळजबरीने 50 हजार रुपये घेऊन  ठाणेदार सोनुने याना दिले. याबाबतची रेकॉर्डींग सुद्धा तक्रार कर्ते जवळ आहे. 50 हजार देऊन सुद्धा ठाणेदार व सहाय्यक फौजदार यांनी दीपक उदकवार याच्यावर चोरीचा खोटा गुन्हा दाखल केल्याने मानहानी झाली व समाजात बदनामी झाली. ट्रॅक्टर पकडून आणला तेव्हा दीपक हॉटेल मध्ये होता ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल न करता 50 हजार घेऊन हेतुपुरस्सर माझ्यावर खोटा चोरीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला. इज्जत व भीती पोटी पैसे देऊनही गुन्हा दाखल करण्यात आल्याने  समाजात दीपक याची मोठी मानहानी झाली व आर्थिक नुकसानही झाले.

 घटनेच्या दिवसाचे सकाळी 5 ते 10.30  पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज काढल्यास होमगार्ड मोहितकर हॉटेलमध्ये 50 हजार घेत असतांनाची रेकॉर्डिंग पुरावा म्हणून मिळणार हे नक्की. पोलीस स्टेशनच्या लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात ही रेकॉर्डिंग झाल्याची माहिती आहे व तसा अंदाज ही वर्तविला जात आहे. घटनेच्या दिवसाचे फुटेज काढल्यास ठोस पुरावा हाती लागेल. पैश्याची मागणी करणारे ठाणेदार धर्मा सोनुने सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर  तसेच पैसे देण्यास मोबाईल वरून तडजोड करून पैसे देण्यास भाग पडणारा तत्कालीन रायटर सुलभ उईके व पैसे घेऊन जाणारा होमगार्ड निखिल मोहितकार यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग व शासकीय कर्तव्यात कसूर केले आहे तरी वरील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 बॉम्बे पोलीस शिक्षा व अपील) नियम1956, बॉम्बे पोलीस फायदा 1951) भारतीय पुरावा कायदा 1872 फौजदारी प्रक्रीया कागदा 1973 भारतीय दंडनहिंता 1860 या कायद्याअंतर्गत गृहणे दाखल वरित निलंबित करण्यात यावे अन्यथा कुटुंबियासह आमरण उपोषण करणार असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक सह वरीष्ठ अधिकारी यांच्या कडे करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...