वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
दोन्ही नवदांपत्यांनी घेतला नेत्रदानाचा संकल्प
चंद्रपूर दिनांक 3 सप्टेंबर: लग्न म्हटलं की सर्व रुढी परंपरा पार पाडल्या जातात मात्र, चंद्रपूर शहरात लग्नाच्या सर्व रूढी परंपरांना फाटा देत सत्यशोधक पद्धतीने एक अनोखा लग्न सोहळा पार पडला.
मंगलाष्टक ऐवजी फुलांच्या अक्षता, पुस्तकांची भेट,साऊ जोती असा आगळा वेगळा विवाह चंद्रपूर शहरात संपन्न झाला. समाजहिताचे उपक्रम राबवुन समाजाला नेत्रदान वृक्षारोपण, तसेच नागरिकांना कोविड-19 काळातील जनजागृती याबद्दलचे महत्व कळावे म्हणुन एक आगळा वेगळा विवाह सोहळा चंद्रपूर शहरात पार पडला. या विवाह सोहळ्यात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील रोशन भास्कर रावेरकर आणि चंद्रपूर येथील श्वेता दिनेश कोवे यांचा विवाह निश्चित झाला, पण हा विवाह सत्यशोधक पद्धतीने करायचा निर्णय दोन्ही नवदांपत्यांनी घेतला. या उच्चशिक्षित जोडप्यांनी सर्व रुढी परंपरांना बाजूला सारत महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीच्या मार्गाने नव्या संसाराची सुरुवात करत पोलीस सभागृह, चंद्रपूर येथे हा विवाह सोहळा संपन्न झाला.
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आदिवासीचे जननायक बिरसा मुंडा, बाबुराव शेडमाके व राणी हिराई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून लग्न विधीच्या कार्याला सुरुवात झाली. दोन्ही नवदांपत्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला. वृक्षारोपण तसेच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या विवाहाच्या निमित्ताने पत्रके वाटून कोरोना जागृतीचा सामाजिक संदेशही देण्यात आला.
यावेळी जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. जि.एल.दुधे, नेत्रदान समुपदेशक योगेंद्र इंदोरकर प्रसिद्ध विचारवंत दिलीप सोळंके, आॅफ्रोटचे जिल्हाध्यक्ष विजय कुमरे, धिरज मेश्राम, अनिसचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...