Home / चंद्रपूर - जिल्हा / रेतीतस्करांकडून या...

चंद्रपूर - जिल्हा

रेतीतस्करांकडून या वर्षात ८० लाखाचा दंड वसूल..

रेतीतस्करांकडून या वर्षात ८० लाखाचा दंड वसूल..

भद्रावतीचे तहसिलदार महेश शितोळे यांची माहीती, रेती तस्करीचा ट्रॅक्टर शहरातील भर चौकात  पकडले.. 

भद्रावती: गेल्या वर्षभरात भद्रावती तहसील प्रशासनाकडून ७९ अवैध रेतीतस्करांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून आतापर्यंत ८० लक्ष रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती भद्रावतीचे तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली आहे. भद्रावती शहरात तथा तालुक्यात अवैध रेतीतस्करांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे तहसिल प्रशासन व्यस्त असल्यामुळे या रेतीतस्करांनी चांगलेच स्वतः चा  फायदा करून घेतला आहे.

विशेषता ग्रामीन भागात महसूल अधिकारी तथा कर्मचारी वेळेत पोहचू शकत नसल्याने ग्रामीन भागात रेतीतस्कर तयार झालेले आहे. रात्रोच्या वेळेस तालुक्यातील मांगली,चंदनखेडा, कोंढा आदी भागात मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी होत असून या तस्करी मुळे शासनाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. महसूल विभाग हा रेतीतस्करीवर लक्ष ठेऊन असून २०२१ मध्ये ७४ अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत ७५ लाख रुपयांचा तर एप्रिल २०२१ मध्ये ९ रेतीतस्करांवर कारवाई करीत ५ लाख रुपयांचा असा एकूण ८० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दि.१ मे रोजी सायंकाळी शहरातील बाजारपेठेत जामा मश्जिद चौकात अवैध रेतीची वाहतूक करीत असलेला एक ट्रॅक्टर पकडण्यात आला असून सदर  ट्रॅक्टर वसंता उमरे किल्ला वार्ड भद्रावती यांच्या मालकीचा असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.ट्रॅक्टर महसूल विभागाने आपल्या ताब्यात घेवून तहसील कार्यालयात जमा केले. याबाबतची पुढील कारवाई महसूल विभाग करीत असल्याची माहिती तहसीलदार महेश शितोळे  यांनी पत्रकारांना दिली.
 त्याच प्रमाणे अवैध रेतीतस्करी करणाऱ्या अनेक ट्रॅक्टरचे नंबर अस्पष्ट असतात व दिसत नाही. त्याचा त्रास नागरीकांनाही होत असल्यामुळे परिवहन विभागाने शहरातील अशा ट्रॅक्टरवर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...