खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) : तालुक्यातील मार्डी येथील शेतकऱ्याने बुद्ध विहारच्या शेजारी असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली . गजानन हरी निमसटकर ( वय ७२ वर्षे ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. १९ सप्टेंबर रोज रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने संपूर्ण पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मार्डी येथील शेतकरी गजानन निमसटकर हे १९ सप्टेंबरला रोज रविवारला एक वाजता पासून चार वाजेपासून राहत्या घरातून बाहेर पडले होते. बुद्ध विहारच्या शेजारी असलेल्या विहीरीत उडी घेत त्यांनी आत्महत्या केली. ते घरात आढळून न आल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरु केली असता दुपारी चार वाजेच्या सुमारास गजानन निमसटकर यांचा मृतदेह बुद्ध विहारच्या शेजारी असलेल्या विहीरीत आढळून आला. पोलीस पाटील डॉ प्रशांत पाटील यांनी याघटनेचे माहिती मारेगाव पोलीसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह विहिरीतील पाण्यातून बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविला. याप्रकरणी मयताचा मुलगा यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार मारेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार याघटनेचा पुढील तपास करत आहेत. मयत गजानन निमसटकर यांच्या पश्चात दोन मुले, , एक मुलगी, असा परिवार आहे. गजानन शेतातील नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गजानन निमसटकर यांनी आत्महत्या केल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. शेतकरी आत्महत्येच्या सदर घटनेने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...