Home / महाराष्ट्र / एका अस्वलीने भल्या...

महाराष्ट्र

एका अस्वलीने भल्या पहाटे अनेकांना दर्शन दिल्याने परीसरात काहीकाळ भितीचे वातावर

एका अस्वलीने भल्या पहाटे अनेकांना दर्शन दिल्याने परीसरात काहीकाळ भितीचे वातावर

वन विभागाने सुखरूप अस्वलीला रेस्क्यू करून सोडले जंगलात 

चंद्रपूर : उन्हाळा आला की जगंलात जंगली प्राण्यांसाठी पिण्याच्या  पाण्याची कमी पणा होत असते व त्यामुळे जंगलातील प्राणी उन्हाळयात  लोकवस्तीकडे येण्याच्या घटना चंद्रपूर जिल्हात मोठया प्रमाणात पाहवयास मिळते अशीच  एका अस्वलीने भल्या पहाटे अनेकांना दर्शन दिल्याने परीसरात काहीकाळ भितीचे वातावरण पसरले होते. वन विभागाने अस्वलीला पकडून जंगलात सोडल्याने नागरीकांनी सुटकेचा श्वास घेतला.
मूल शहरातील  बफर झोनचे वनपरीक्षेञ अधिकारी नायगमकर यांना पहाटे ५.३० वा. चे सुमारास एक अस्वल वन कार्यालयाच्या परीसरात शिक्षक काँलनी लगत आश्रयाने असल्याचे दिसुन आले.  लोकवस्तीत आलेली अस्वल अनेकांना दिसल्याने सदर अस्वल कुतुहलाची तर काहींना दहशतीची वाटु लागली. त्यामुळे लोकवस्तीत आलेल्या अस्वलीला पकडून जंगलात सोडण्यासाठी स्थानिक वनाधिकारी राजुरकर, ताडोबा येथील आरआरटी पथक व संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे यांना माहीती देण्यात आली. दरम्यान अस्वलीला पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केल्याने अस्वलीला पकडण्याची मोहीम सुरू केली, दरम्यान  आवाजाने घाबरलेल्या अस्वलीने भिंतीवरून उडी मारून पलीकडच्या खाजगी स्नानगृहा लगतच्या बोळीत आसरा घेतल्यानंतर आरआरटी पथक ताडोबाचे मदतीने सदर अस्वलीला बेशुध्दीचे इंजेक्शन मारून सुरक्षीतपणे पकडण्यात आले. बेशुध्द झालेल्या ३ वर्षाच्या मादी अस्वलीला पकडल्यानंतर केळझरच्या जंगलात सोडण्यात आले. सदर अस्वलीला मागील काही दिवसांपासुन रेल्वे स्टेशन, कर्मवीर महाविद्यालय, चरखा संघ, उपजिल्हा रुग्णालय आणि विहीरगांव परीसरात राञौच्या वेळेत अनेकांनी पाहले होते . परंतु सदर अस्वलीने आजपर्यंत कोणावरही हल्ला केल्याचे ऐकण्यात आले नाही. मूल शहर हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगला लगत असल्याने यापुर्वीही एका अस्वलीने चरखा संघ परीसरात, कर्मवीर महाविद्यालयाच्या शौचालयात आसरा घेतला होता तर एका अस्वलीने रेल्वे फाटका लगतच्या वर्दळीच्या पुलाखाली पिल्लांना जन्म दिला होता. एक दोनदा हरणालाही शहरातील विविध भागात फिरतांना अनेकांनी पाहले. आज पुन्हा एका अस्वलीने चक्क वन कार्यालयातच आश्रय घेतल्याने सदर घटनेची शहरात चर्चा झाली . अस्वलीला पकडण्याच्या वेळेस सहाय्यक उपवन संरक्षक लखमावाड, वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर, टीटीसीचे डॉ.पोडचलवार, अजय मराठे यांचे नेतृत्वात आरआरटी पथक, क्षेत्र सहाय्यक खनके, वनरक्षक मरसकोल्हे, गुरनुले, विषेश व्याघ्र संरक्षन पथक व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार, स्वप्निल आक्केवार, दिनेश खेवले,अंकुश वाणी , संकल्प गणवीर, प्रतीक लेनगुरे, यश मोहुर्ले आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...