महाराष्ट्र

"होळी,धूलिवंदन आणि रंगपंचमी"


भारतीय वार्ता (प्रतिनिधी): होळी हा सण साजरा करण्याची प्रथा भारतात आणि नेपाळच्या बहुतांश भागातून दीर्घकाळापासून चालत आलेली आहे. त्याशिवाय, भारतीय लोक जगातील ज्या विविध देशांत स्थलांतरित झाले आहेत तेथेही आणि भारतीय संस्कृतीचा प्रभाव असलेल्या विविध देशातही तो साजरा केला जातो. हा सण महाराष्ट्रात प्रामुख्याने मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा आहे.तथापि,या काळात रब्बीचीही बहुतांश पिके निघाली असल्यामुळे शेतीचा त्या वर्षीचा हंगाम समाप्त झाला असल्याबद्दल आपल्या शेतांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचाही,हंगामाला निरोप देण्याचाही आहे.
हा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो.उत्तर भारतातील कालगणनेनुसार चैत्र वगैरे भारतीय महिने पूर्णिमान्त असतात.त्यामुळे फाल्गुन पौर्णिमेचा दिवस हा तेथे फाल्गुन महिन्याचाही आणि शिशिर ऋतूचाही शेवटचा दिवस असतो.महाराष्ट्रामध्ये महिने पौर्णिमेला समाप्त न होता अमावस्येला समाप्त होतात.त्यामुळे येथे फाल्गुन पौर्णिमेचा दिवस हा वर्षाच्या अखेरच्या महिन्यातील शुक्ल पक्षाचा शेवटचा दिवस असतो आणि वर्ष समाप्त होण्याचा काळ जवळ आलेला असतो.
वर्षाची सुरुवात नव्या पालवीसह येणार्या वसंत ऋतूने आणि वर्षाची अखेर पानगळ करणार्या शिशिर ऋतूने होते,या घटनेचा होळी या सणाशी निकटचा संबंध आहे.जीवनाच्या प्रवासात चढउतार अनुभवणार्या मानसाच्या आयुष्यातही एकप्रकारे असेच ऋतुचक्र असते.र्हास,पराजय,नुकसान, वैफल्य,नैरास्य, दु:ख, चुका उणिवा इत्यादिंमुळे मनाची खचलेली अवस्था,हा एकप्रकारे मानवी जीवनातील शिशिरच असतो.निसर्गातील शिशिराला निरोप देताना आपल्या आयुष्यातील या शिशिरालाही निरोप देण्याची दृष्टी आपल्याला होळीमुळे मिळते. म्हणून आपण या प्रसंगी त्या प्रकारचे उपक्रम आयोजित करावेत.
होळी पेटविण्यासाठी वृक्ष तोडू नयेत.होळीसाठी कुणाचे लाकडे विनापरवाणगी आणण्याचे कृत्यही अजिबात करता कामा नये.होळीच्या वेळी केले जाणारे सदभिरुचिला साजेसे नसलेले बोलणे,वागणे इ.मुळीच करू नये.होळीमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही,याची पुरेपूर दक्षता घ्यावी.होळीमध्ये अन्नपदार्थ अर्पण करू नयेत.होळीचा संबंध शिवाने मदनाचे दहन केले या घटनेशी जोडणारी कथा सांगितली जाते.तिचा सुचित अर्थ असा,हा सण अनिष्ट मनोविकार,अनुचित आचार दूर करण्याचे प्रतीक आहे.मन स्वच्छ करायचे,तसाच विशिष्ट परिसर निवडून तेथिल कचरा दूर करावा आणि तेथे मन प्रसन्न करणारी स्वच्छता निर्माण करावी.हा सण या भूमिकेला साजेशा पद्धतीने साजरा करावा.बळीराजाचा पणजोबा असलेल्या हिरण्यकशिपूची बहिण होलिका हिच्याशी होळीचा विशिष्ट संबंध जोडणारी कथा कल्पनेने रचण्यात आली त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवू नये.हिरण्यकशिपूचा पुत्र प्रल्हाद हा आपल्या शिवभक्त वडिलांच्या विरोधात जाऊन विष्णुभक्त बनला होता,अशा अर्थाच्या पुराणकथा आपल्याकडे रचण्यात आल्या आहेत.स्वत: हिरण्यकशिपु प्रल्हादाला ठार मारण्यासाठी वेगवेगळे उपाय करतो,असे या कथा सांगतात.एकदा प्रल्हादाला जाळून मारण्यासाठी त्याला अग्नीमध्ये ठेवण्यात येते.होलिकाही हिरण्यकशिपूचा हेतू सफल व्हावा म्हणून प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसते;अखेरीस प्रल्हाद सुखरूप राहतो,परंतु होलिका मात्र जळून मरते,असे ही कथा सांगते.वस्तुत:,प्रल्हाद वडिलाच्या विरोधात गेला हे खरे नसून तो युद्धामध्ये इंद्राकडून मारला गेला,ही वस्तुस्थिती आहे.अशा परिस्थितीत हिरण्यकशिपूने वा होलिकेने त्याला जाळून मारण्याचा प्रयत्न केला,ही गोष्ट खरी नाही.प्रल्हादाची कथा पूर्णपणे बदलून त्याचे चारित्र्यहनन करण्यात आले आहे.या प्रल्हादानेच चार्वाकदर्शनाचा पाया घातला आणि पुढे त्याचा एक पुत्र विरोचन याने ते चार्वाकदर्शन अधिक विकसित करून पुढच्या टप्प्यावर नेले आणि त्याचा दुसरा पुत्र कपिल याने विख्यात सांख्य तत्त्वज्ञानाचे प्रवर्तन केले.हे सर्व ध्यानात घेऊन आपण प्रल्हादाविषयीचे गैरसमज दूर केले पाहिजेत.तसेच,होलिकेविषयीची अशा प्रकारची कथा खोटी म्हणून नाकारली,तरी होलिकेची पुजा करण्याचा जो उपक्रम तो कृतज्ञतापूर्वक योग्य रितीने चालू ठेवावा.
उत्तर भारतात होळीचा दुसरा दिवस हा वसंत ऋतूचा पहिला दिवस असतो.त्याचे स्वागत करण्यासाठी त्या दिवशी तिकडे रंगाचा सोहळा साजरा केला जातो.महाराष्ट्रात मात्र हा दिवस फाल्गुन वद्य प्रतिपदेचा असतो आणि धुलिवंदनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.हा धनधान्य देणार्या पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिला वंदन करण्याचा दिवस होय.खरे तर होळीचा दिवस आणि धुलिवंदनाचा दिवस हे दोन्ही दिवस मिळून सयुक्तपणे एकच सण होय.बारकाईने भाषेचा अभ्यास केल्यास 'धुली' आणि 'होली' हे दोन्ही शब्द बहुजनांच्या देशी भाषेतील एकाच शब्दापासून बनले आहेत आणि त्यांचा मुळ अर्थही 'पृथ्वी' असा एकच आहे,हे अगदी उघड आहे.पृथ्वीला 'निर्ऋती' म्हटले जाते,हे पाहाता होळी हे निर्ऋतीचेच एक रुप आहे.स्वाभाविकच,धुलिवंदनाच्या दिवशी पृथ्वी,होळी आणि निर्ऋती यांना एकरूप वा परस्पर सबंध मानून त्यांची पुजा करावी.त्या दिवशी एकमेकांच्या अंगाला माती लावण्याची प्रथा आहेच.तिच्यामागचा हेतू आपले मातीबरोबरचे दृढ नाते स्पष्ट करण्याचा आहे.आपणही या दिवशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मातीचा स्पर्श अनुभवावा.परंतु त्या दिवशीही सदभिरूचीला सोडून कोणतेही कृत्य करू नये.
उत्तर भारतात रंगांचा खेळ फाल्गुन पौर्णिमेला दुसर्या दिवशी खेळला जातो.महाराष्ट्रात मात्र दुसर्या दिवशी धूलिवंदन आणि पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो.महाराष्ट्रातील प्रथेप्रमाणे मावळते वर्ष अजून सरलेले नसल्यामुळे होळीच्या दुसर्या दिवशी नवे वर्ष वा वसंत ऋतू सुरू होत नाही.असे असले,तरी फाल्गुन पौर्णिमेच्या नंतरचा अमावस्येपर्यंतचा पंधरवाडा हा फाल्गुन महिण्याचा,शिशिर ऋतूचा आणि सरत्या वर्षाचा शेवटचा पंधरवाडा असल्यामुळे हा संक्रमनाचा काळ असतो.शिशिर ऋतू संपण्याच्या आणि वसंत ऋतू सुरू होण्याच्या खुणा बाह्य सृष्टीवरही दिसू लागलेल्या असतात.पानगळ झालेल्या झाडांपैकी काही झाडांना पालवी फुटायला सुरुवात झालेली असते.याचा अर्थ एक प्रकारे नव्या वर्षाची आणि वसंत ऋतूची चाहूल लागलेली असते.होळी आणि धूलिवंदन या दिवशी मावळत्या वर्षाला निरोप देवून झालेला असतो.त्यामुळे संक्रमणाच्या काळात नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सूरु झालेली असते.त्या स्वागताची पूर्वतयारी म्हणून रंगपंचमीच्या स्वरुपात आनंदसोहळा साजरा केला जातो,समाजजीवनात एक नवा उत्साह,आनंदाची ऊर्मी परस्परसंबंधाचे दृढीकरण,क्रीडेचा आनंद,हास्यविनोद यांना भरती आलेली असते.हा निकोप स्वातंत्र्याचा आनंद घेण्याचा प्रसंग असतो.
आधुनिक काळात हा सण साजरा करायचा झाल्यास त्याचे निकोप स्वरुप कायम राखण्याची काळजी घेतली पाहिजे.या प्रसंगी वापरले जाणारे रंग कोणत्याही प्रकारे अपायकारक असणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. प्रदुषण होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.कुणाला त्रास देणे,मनस्ताप निर्माण करणे,छळणे,सूड घेणे,अपाय करणे,शारिरीक इजा पोचविणे इ.प्रकारच्या अनिष्ट गोष्टींना अजिबात धारा देता कामा नये.आपल्या रंगांच्या खेळाशी संबंध नसलेल्या,रस्त्याने आपल्या नियोजित कामासाठी प्रवास करणार्या व्यक्तींना अडवणे,त्यांच्यावर जबरदस्तीने रंग फेकणे,त्यांच्या प्रवासात अडथडा आणणे,त्यांचा खोळंबा करणे इ. प्रकारही मुळीच करू नयेत.ही पथ्ये पाळून मन प्रसन्न करणारा आनंद घेण्यास हरकत नाही.

।। जय जिजाऊ ।।
सौजन्य - शिवधर्म गाथा
संकलन - रामचंद्र सालेकर

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...