शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
३१४५४१ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह तर 39 मृत्यु..
वणी: जिल्ह्यात गत 24 तासात 929 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 885जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 39 मृत्यु झाले. यातील 31 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर आठ मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. तसेच एक मृत्यु जिल्ह्याबाहेरील आहे.
जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 5729 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 929 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4800 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5758 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 3052 तर गृह विलगीकरणात 2706 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 43236 झाली आहे. 24 तासात 885 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 36487 आहे. तर जिल्ह्यात एकूण 991 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.96 असून मृत्युदर 2.29 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 42, 45, 39, 68, 75, 79, 34, 32 वर्षीय पुरुष आणि 31, 66 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 65 वर्षीय महिला, मारेगाव तालुक्यातील 78 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 74, 60 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 43 वर्षीय पुरुष, राळेगाव तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 28, 64, 65 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील 49 वर्षीय पुरुष, वणी येथील 28, 60 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, उमरखेड येथील 40 वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील 65 वर्षीय महिला, केळापूर येथील 48 वर्षीय पुरुष, केळापूर तालुक्यातील 58 वर्षीय पुरुष आणि माहूर (जि. नांदेड) येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 70 वर्षीय पुरुष व 55, 65, 92 वर्षीय महिला, महागाव येथील 65 वर्षीय पुरुष, राळेगाव येथील 42 वर्षीय पुरुष, पुसद येथील 65 वर्षीय पुरुष आणि दारव्हा येथील 35 वर्षीय पुरुष आहे.
बुधवारी पॉझेटिव्ह आलेल्या 929 जणांमध्ये 545 पुरुष आणि 384 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 233 पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद 127, वणी 122, दिग्रस 98, महागाव 48, दारव्हा 46, नेर 44, घाटंजी 39, आार्णि 38, पांढरकवडा 35, उमरखेड 26, बाभुळगाव 25, मारेगाव 16, कळंब 12, झरी 7, राळेगाव 5 आणि इतर शहरातील 8 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 361647 नमुने पाठविले असून यापैकी 357777 प्राप्त तर 3870 अप्राप्त आहेत. तसेच 314541 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 577 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 0 बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील चार डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 240 बेडपैकी 133 रुग्णांसाठी उपयोगात, 107 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 31 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 2383 बेडपैकी 1720 उपयोगात, 663 शिल्लक आणि 23 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 789 बेडपैकी 581 उपयोगात तर 208 बेड शिल्लक आहेत.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...