शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
वणी दि. 20 : जिल्ह्यात मंगळवारी 29 मृत्युसह 850 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विविध कोव्हीड सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटर येथे भरती असलेल्या 788 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 5749 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 850 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4899 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5753 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2915 तर गृह विलगीकरणात 2838 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 42307 झाली आहे. 24 तासात 788 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 35602 आहे. तर जिल्ह्यात एकूण 923 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.90 असून मृत्युदर 2.25 आहे.
गत 24 तासात जिल्ह्यात एकूण 29 मृत्यु झाले. यातील 25 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर चार मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 82, 35, 45 वर्षीय पुरुष आणि 68, 83, 29 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 71 वर्षीय पुरुष, पांढरकवडा शहरातील 51 व 83 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 33 व 63 वर्षीय पुरुष, बाभुळगाव येथील 54 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 52 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 44 वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, राळेगाव तालुक्यातील 58 वर्षीय महिला, पुसद येथील 46 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 42 वर्षीय महिला, दिग्रस येथील 81 वर्षीय महिला, आर्णि शहरातील 36 वर्षीय महिला, राळेगाव शहरातील 40 वर्षीय पुरुष, नागपूर येथील 49 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, माहूर येथील 60 वर्षीय महिला आणि वर्धा येथील 57 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 70 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 52 वर्षीय महिला आणि वणी येथील 56 व 66 वर्षीय महिलांचा समावेश आहे.
मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 850 जणांमध्ये 529 पुरुष आणि 321 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 256 पॉझेटिव्ह रुग्ण, पांढरकवडा 89, उमरखेड 27, दिग्रस 73, पुसद 61, वणी 41, कळंब 32, नेर 19, बाभुळगाव 13, घाटंजी 54, मारेगाव 18, राळेगाव 4, महागाव 14, दारव्हा 87, आर्णि 23, झरीजामणी 33 आणि इतर शहरातील 6 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 355535 नमुने पाठविले असून यापैकी 352047 प्राप्त तर 3488 अप्राप्त आहेत. तसेच 309740 नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 545 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 32 बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील चार डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 240 बेडपैकी 105 रुग्णांसाठी उपयोगात, 135 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 31 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 2453 बेडपैकी 1643 उपयोगात तर 810 शिल्लक आणि 20 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 729 बेडपैकी 535 उपयोगात तर 194 बेड शिल्लक आहेत
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...