Home / महाराष्ट्र / कृषी विभागाच्या धाडीत...

महाराष्ट्र

कृषी विभागाच्या धाडीत 70 लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त

कृषी विभागाच्या धाडीत 70 लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त

कृषी विभागाच्या धाडीत 70 लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त, कृषी विभागाने नोंदविला गुन्हा

चंद्रपूर :  कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने गोपणीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहराच्या बाबुपेठ परिसरातील समता चौक, गणेश एजन्सी प्लॉट येथे 1 मे रोजी धाड टाकली असता तेथे अनधिकृत मान्यता प्राप्त नसलेले संशयित कापुस (HTBT) बियाणे पॉकिग सुरु असल्याचे आढळून आले. 
या धाडीमध्ये अभिजीत मानिकचंद्र दुर्गे यांनी आरोपी सोहील अब्दुल तसलिम शेख, जलनगर, चंद्रपुर याला भाड्याने दिलेल्या रुममध्ये अनधिकृत मान्यता प्राप्त नसलेले संशयित कापुस (HTBT) बियाणे, खाली पॉकेट व पॉकिग मशिन आढळुन आले.  संशयित कापुस बियाण्यामध्ये राघवा-9 , मेघना-45, अरुणोदया, पवनी सिडस व दंबग तसेच खुले बियाणे मोठया प्रमाणावर आढळुन आले. सध्याच्या शासकिय दरानुसार सदर जप्त केलेले बियाण्याची अंदाजित रक्कम 68 ते 70 लाख रुपये असुन या प्रकरणात कृषि विभागा मार्फत गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक श्री. चालुरकर करीत आहेत.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्हयातील शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत कृषि केंद्र धारकाकडुनच मान्यता प्राप्त बियाणे खरेदी करावे. तसेच कोणत्याही अनोखळी व्यक्तीकडुन प्रतिबंधित कापुस बियाणे खरेदी न करण्याचे तसेच या संबंधी अनाधिकृत कृषि निविष्ठा विक्री करीत असल्याची माहीती मिळाल्यास दुरध्वनी क्रंमाक 07172-271034 किंवा  07172-253297 वर तसेच तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पं.स. व पोलीस विभागास माहीती कळविण्याचे आवाहन भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाचे अधिकारी शंकर किरवे, जिल्हा गुण नियत्रण निरीक्षक प्रशांत मडावी, तालुका कृषि अधिकारी चंद्रकांत ठाकरे, यांनी चंद्रपुर शहर पोलीस स्टेशन येथिल पोलीस निरीक्षक श्री. अंभोरे यांच्याशी संपर्क साधून  उपनिरिक्षक श्री. चालुरकर व श्री. मोरे यांच्या सहकार्याने संबधित ठिकाणी  धाड टाकली. सदर धाडीमध्ये  कृषि अधिकारी सुशिल आडे, साकेत बावनकुळे, अमोल उघडे, मकरंद लिंगे, जया व्यवहारे यांचे सहकार्य लाभले असल्याचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...