Home / चंद्रपूर - जिल्हा / आरटीई अंतर्गत 25 टक्के...

चंद्रपूर - जिल्हा

आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून..

आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून..

निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश 20 दिवसांत पूर्ण करावे

चंद्रपूर (उमेश तपासे) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेची ऑनलाईन सोडत 7 एप्रिल 2021 रोजी  काढण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत निवड यादीत सोडत लागली आहे, त्या पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथ) दिपेंद्र लोखंडे यांनी केले आहे.

सन 2021-22 या वर्षाची आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि.11 जून 2021 पासून सुरू करण्यात येत आहे. तसेच निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरीता 20 दिवसांचा कालावधी देण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करू नये. शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे त्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा दिनांक आरटीई पोर्टलवर देण्यात येईल. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन शाळेत आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.

बरेच पालक शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आरटीई प्रवेश फॉर्म भरताना चुकीचे अंतर दाखवतात. त्यामुळे रहिवासी पत्त्याचा पुरावा इत्यादी कागदपत्रांवरून शाळा व निवासी पत्त्याच्या अंतराची पडताळणी करण्यात येईल. निवड यादीतील बालकांबाबत चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देऊ नये. अशा पालकांना तालुकास्तरीय समितीकडे अर्ज करता येईल. पडताळणी समितीने त्यांच्याकडे आलेले अर्ज व तक्रारीची शहानिशा करूनच प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेश सुरु होण्याआधी प्रवेश द्यावा किंवा देऊ नये याबाबतचा आदेश शाळांना द्यावा. त्या आदेशाप्रमाणे शाळेने कार्यवाही करावी.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन या कारणांमुळे जे पालक प्रत्यक्षरीत्या शाळेत प्रवेशासाठी येऊ शकत नाही अशा बालकांच्या पालकांनी विहित मुदतीत दूरध्वनी, ई-मेल, व्हाट्सअॅपद्वारे शाळेत संपर्क करून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतीक्षा यादी मधील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल. त्याबाबत सविस्तर सूचना आरटीई पोर्टलवर दिल्या जातील.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...