Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / केंद्रीय मंत्री नितीनजी...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्‍या सहकार्याने 25 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्‍या सहकार्याने 25 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध
ads images

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मानले नितीन गडकरी यांचे आभार, आणखी 150 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध होणार – आ. सुधीर मुनगंटीवार

Advertisement

चंद्रपूर : केंद्रीय भुतल परिवहनमंत्री तथा ज्‍येष्‍ठ भाजपा नेते नितीनजी गडकरी यांच्‍या सहकार्याने बल्‍लारपूर, मुल , पोंभुर्णा आणि चंद्रपूर येथील रूग्‍णालयांसाठी 25 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटरचे वितरण माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले.

Advertisement

बल्‍लारपूर, मुल, पोंभुर्णा आणि चंद्रपूर येथील रूग्‍णालयांसाठी सदर 25 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर दिनांक 4 मे रोजी वितरीत करण्‍यात आले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या विनंतीच्‍या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी 25 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध करून दिले आहे. या आधी आमच्‍या विनंतीला मान देत चंद्रपूर जिल्‍हयातील जनतेच्‍या आरोग्‍य सुविधेच्‍या द़ष्‍टीने ना. नितीनजी गडकरी यांनी 15 एनआयव्‍ही, 2 मिनी व्‍हेंटीलेटर आणि 15 मोठे व्‍हेंटीलेटर जिल्‍हा रूग्‍णालयाला उपलब्‍ध करून दिले आहेत. नितीनजी गडकरी यांचे चंद्रपूर जिल्‍हयावर विशेष प्रेम आहे. या जिल्‍हयाच्‍या विकासासाठी केंद्रीय मार्ग निधीच्‍या माध्‍यमातुन वेळोवेळी भरघोस निधी त्‍यांनी मंजुर केला आहे. या संकटसमयी देखील त्‍यांनी आपल्‍या सहकार्याचा हात चंद्रपूर जिल्‍हयातील जनतेला दिला आहे. लवकरच आणखी 150 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध होणार असल्‍याचे सांगत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नितीनजी गडकरी यांचे आभार मानले.

यावेळी पोंभुर्णा पंचायत समितीच्‍या सभापती अल्‍का आत्राम, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहुल संतोषवार, मुल नगरपरिषदेचे उपाध्‍यक्ष नंदु रणदिवे, निलेश खरबडे, समिर केने, मनिष पांडे, सुभाष कासनगोट्टुवार, किशोर कापगते, प्रशांत समर्थ, अजित मंगळगिरीवार, ऋषी कोटरंगे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

झरी-जामणीतील बातम्या

शेतकरी विकास विद्यालयाच्या ग्रंथालयाला पुस्तक संच भेट

झरी :मांगली येथील श्री.विलास कसोटे यांचा एकुलता एक मुलगा दिवंगत कुणाल विलास कसोटे बारा वर्षापूर्वी मरण पावला होता...

झरी तालुक्यात पीकविमा कंपनी प्रतिनिधी कडून शेतकऱ्यांची लूट

झरी :निसर्गाच्या लहरीपणामुळे झरी तालुक्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.खरीप...

उमेद संघटनेच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन

झरीजामणी :उमेद संघटनेच्या एकमेव प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे दिनांक ३ आक्टोंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन...