वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
पहिल्या टप्प्यातील 408 अंगणवाड्यांना सौर ऊर्जा संच
उमेश तपासे (चंद्रपूर) : जि. प. महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील 408 अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच लावण्यात आले आहे. त्यामुळे सदर केंद्रांना आता 24 तास विद्युत पुरवठा करता येणार आहे. गावातील अंगणवाडी अंतर्गत बालकांना आंनददायी शिक्षणाचे संस्कार मिळावे म्हणून जिल्हयातील सर्व अंगणवाडी केंद्रांना सईसुविधा युक्त करण्याचे काम सुरु आहे. अंगणवाडी केंद्रांमध्ये विद्युत पुरवठा, पंखा, बल्ब, LED TV, बालकांची खेळणी, बाल आकार साहित्य यासह सौर ऊर्जा संचाचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्हयात एकूण 2684 अंगणवाडी केंद्र असून महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत पहिल्या टप्पात 408 अंगणवाडी केंद्रांना 24 तास विद्युत पुरवठा मिळण्यासाठी सौर ऊर्जा संच लावण्यात आले आहे. हे संच अंगणवाडी केंद्रांना 24 तास विद्युत पुरवठा कशाप्रकारे करेल, यापासून बालकांना कुठली इजा तर होणार नाही, यासारख्या अनेक प्रश्नांची दखल घेऊन जिल्हा परिषद, चंद्रपूर मार्फत सचित्र मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने बॅटरीचा वापर, वादळी वारा 150 किलोमीटर प्रति तासपर्यंत वाहत असल्यास सौर ऊर्जा संच पॅनलकरीता वापरण्यात येणारे मजबूत फ्रेम व त्यासाठी फ्रेमला सिंमेटने मजबूती देणे, ओव्हरलोड किंवा सदोष स्थितीमध्ये अंगणवाडी केंद्रांतील उपलब्ध इलेक्ट्रॉनिक साहित्य सुरक्षित राखण्याकरीता एमसीबी बाॅक्स लावणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने व अपघाताची शक्यता टाळण्याकरीता सौर ऊर्जा संच मधील बॅटरी व इन्व्हर्टर एकत्रितपणे ठेवण्याकरीता विशेष लोखंडी बॉक्सची व्यवस्था करणे, पॅनल चोरीला जाऊ नये म्हणून अॅंटी थेप्ट स्क्रू चा वापर करणे, इलेक्ट्रीक अर्थिंगची सोय करणे, पॅनल ते इन्व्हर्टर पर्यंतचे सर्व वायर केसिंगने बंदिस्त करणे इत्यादी महत्वपूर्ण बाबींचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक संचाला हाताळणी करतांना काय करावे व काय करु नये, याबाबतचे सोप्या भाषेतील दिशानिर्देश पत्रक लावण्यात आले. या सर्व संचाची मोफत दुरुस्ती व व्यवस्थापनाकरीता संबंधित पुरवठा धारकांशी 5 वर्षाचा करारनामा करण्यात आलेला आहे
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...