Home / महाराष्ट्र / पोलीस सेवेत 15 नवीन बोलेरो...

महाराष्ट्र

पोलीस सेवेत 15 नवीन बोलेरो वाहन दाखल

पोलीस सेवेत 15 नवीन बोलेरो वाहन दाखल

24 तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागाची कार्यक्षमता अधीक गतीमान होणार     - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर दि.10 मे: पोलीस विभागाकरिता जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून खरेदी करण्यात आलेली महिंद्रा बोलेरो कंपनीची नवीन 15वाहने पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे आज हस्तांतरीत करण्यात आली. या वाहनाचा उपयोग 24 तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागाला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व पोलीस विभागाची कार्यक्षमता अधीक गतिमान करण्यासाठी होईल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
         यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरवींद  साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.
वाहनांमध्ये महिंद्रा डिफेन्स सिस्टिम या कंपनीने सर्व तांत्रिक सहाय्य पुरविलेले आहे. या वाहनाच्या  माध्यमातून गुन्हेगारीवर आळा बसून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पोलिसांना मोठी मदत होणार असल्याचे मत खा. बाळू धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
पोलीस विभागाद्वारे 112 हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या क्रमांकावर अडचणीच्या वेळी संपर्क साधल्यास जीपीएस लोकेशनद्वारे व्यक्तीशी संपर्क साधला जातो व पोलिसांमार्फत वेळेवर मदत पोहोचविल्या जाते.
               जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनला इमर्जन्सी रिस्पॉन्स वेहिकल उपलब्ध करून देण्यात येणार असून नवीन वाहनामुळे गरजू नागरिकांना तात्काळ प्रतिसाद मिळण्यास मदत होईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी यावेळी दिली.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...