Home / महाराष्ट्र / गडचिरोलीत चकमकीदरम्यान...

महाराष्ट्र

गडचिरोलीत चकमकीदरम्यान पोलिसांकडून 13 नक्षलवादी ठार 

गडचिरोलीत चकमकीदरम्यान पोलिसांकडून 13 नक्षलवादी ठार 

गडचिरोलीत चकमकीदरम्यान पोलिसांकडून 13 नक्षलवादी ठार 

गडचिरोली, दि. 21 (वृत्तसंस्था) : गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. एटापल्लीमधील पेदी-कोटमी येथील जंगलात झालेल्या या चकमकीत पोलिसांनी 13 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिटकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

           गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून नक्षलीविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. जंगलात अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असणार्‍या ठिकाणी पोलिसांची तुकडी पोहचली. पोलीस दिसताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत 13 नक्षली ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. चकमक अजूनही सुरू असून मृतदेह एकत्र करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक गोयल यांनी सांगितले. एकूण किती नक्षलवादी ठार झाले आहेत ही माहिती अभियान संपल्यावर सांगता येईल, असे ते म्हणाले.


कसनसूर येथे नक्षलवादी दल एकत्र आले होते. सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. या हंगामात नक्सल तेंदू कंत्राटदारांकडून मोठी खंडणी वसूल करतात. त्याचे नियोजन करण्यासाठी नक्षलवाद्यांची बैठक सुरू होती, अशी माहिती आहे. खबर्‍यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रात्रीपासून पोलिसांनी अभियानाची तयारी सुरू केली होती. याच अभियानादरम्यान आज सकाळपासूनच पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती .

यातिल 13 नक्षलवाद्यांवर होते 60 लाखांचे बक्षीस !

गडचिरोलीतील एटापल्लीमधील पेदी-कोटमीच्या जंगलात चकमकीत ठार झालेल्या सर्व 13 नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यात गडचिरोली पोलिसांनी यश आले आहे. या सर्व 13 नक्षलवाद्यांवर 60 लाखांचे बक्षीस होते, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.
        आजच्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये कंपनी क्रमांक चार दलमचा विभागीय समिती सदस्य तथा जहाल नक्षलवादी सतीश उर्फ अडवे देवू मोहंदा याचा समावेश आहे. त्याच्यावर 16 लाखांचे बक्षीस होते. कसनसूर दलमची नंदिनी उर्फ प्रेमबत्ती मडावी हिच्यावर 6 लाख, किशोर उर्फ शिवा उर्फ शिवाजी बारसू गावडे 4 लाख, कसनसूर दलमचा उपकमांडर रूपेश उर्फ लिंगा मस्तारी गावडे याच्यावर 6 लाखाचेे, सेवंती हेडो हिच्यावर 2 लाख, किशोर होळी याच्यावर 2 लाख, क्रांती उर्फ मैना उर्फ रीना माहो मट्टामी हिच्यावर 2 लाख, गुनी उर्फ बुकली धानू हिचामी हिच्यावर 4 लाख, रजनी ओडी 2 लाख, उमेश परसा याच्यावर 6 लाख, सगुना उर्फ वासंती उर्फ वत्सला लालू नरोटे हिच्यावर 2 लाख, सोमरी उर्फ सुनीता उर्फ सविता पापय्या नैताम हिच्यावर 6 लाख, तर रोहित उर्फ मनेश उर्फ मानस उर्फ सोनारू सन्नू कारामी याच्यावर 2 लाखाचे बक्षीस होते.या मोहिमेत पोलीस दलांने  मोठे ऐश संपादन केले असून नक्षलदलम मध्ये खळबळ माजली आहे.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...