शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
मान्सून लवकरच केरळ मध्ये दाखल होणार
पुणे : देशात जून ते सप्टेंबर या दरम्यान सरासरीच्या १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले असेल, तर मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने एप्रिलमध्ये जाहीर के लेल्या जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाच्या पहिल्या अंदाजातही सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता. यंदा मोसमी पावसाचा केरळमध्ये दाखल होण्याचा प्रवास काहीसा लांबल्याचे चित्र आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मोसमी पावसाचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज मंगळवारी जाहीर केला.
गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुमारास तीव्र असलेला ला निना हा घटक २०२१च्या सुरुवातीपासून क्षीण होऊ लागला आहे. तसेच प्रशांत महासागरातील स्थिती स्थिर राहील. १९६१ ते २०१० या काळात देशात दीर्घकालीन सरासरीनुसार ८८ सेंटिमीटर पाऊस झाला आहे. त्या आधारावर पावसाचा अंदाज काढण्यात आला आहे.
दक्षिणेच्या राज्यातील काही भागांमध्ये, उत्तरेच्या आणि ईशान्येकडील राज्यांतील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मोसमी पावसाचे देशभरातील वितरण चांगले असेल. त्यामुळे देशभरातील बहुतांश भागामध्ये सरासरीइतका किं वा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने नमूद के ले आहे.
यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या १०१ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यात चार टक्क्यांपर्यंत वाढ-घट होऊ शकते.
राज्यात काय?
राज्यात सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असला, तरी मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. खरीप हंगामातील पिकांच्या दृष्टीने पावसाचा अंदाज सकारात्मक आहे.
अरबी समुद्रातील चक्रीय स्थिती मोसमी वाऱ्यांसाठी अडथळा ठरत होती. त्यामुळे मोसमी पावसाचे केरळमधील आगमन लांबले आहे. मोसमी वाऱ्यांसाठी अडथळा ठरलेली परिस्थिती निवळून आता पोषक वातावरण निर्माण झाले असून, ३ जूनपर्यंत मोसमी वारे के रळमध्ये दाखल होणार आहेत.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...