आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मारेगाव: तालुक्यातील वरुड गावाजवळील पारधी बेडया ला जोडणाऱ्या रस्त्याची गेल्या तीन पिढ्यांपासून अतिशय दुर्दशा झाल्यामुळे पारधी बेडा विकासापासून कोसो दूर राहिलेला आहेत. पारधी बेडयावर ये-जा करण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याने दळणवळनाची तसेच मोठ्या प्रमाणात शिक्षण व आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.
तेव्हा या रस्त्याचे लवकरात लवकर मजबूत बांधकाम व डांबरीकरण करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबतचे निवेदन वनविभाग, मारेगाव ला पारधी बेडा येथील नागरिकांनी शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर 2021 म्हणजेच संविधान दिना दिवशी दिले. सविस्तर वृत्त असे की वरुड ते सालेभट्टी रस्ता वन विभाग, मारेगाव यांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने वरुड गावाजवळील पारधी बेड्यावर जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करण्याची परवानगी वनविभाग, मारेगाव यांना द्यावी लागते.त्यासाठी पारधी बेड्यातील गावकऱ्यांनी वनाधिकारी, वनविभाग मारेगाव यांना रस्ता बांधकाम परवानगी मिळण्याबाबतचे निवेदन दिले. पारधी बेड्या ला जोडणाऱ्या रस्त्याची परिस्थिती अतिशय खराब झाली आहे, शेतातील पांदण रस्त्यापेक्षा अतिशय भयानक परिस्थिती या रस्त्याची झाली आहे. गेल्या तीन पिढ्यापासून गावात मजबूत रस्ता मिळालेला नाही आहे त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे पूर्ण पाठ फिरवली आहे.
शाळेत जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने दळणवळणाच्या साधनांचा अभाव दिसून येत आहे. शाळेत जायचे तरी कसे? असा गंभीर प्रश्न गावातील विद्यार्थ्यांना पडला आहे. योग्य रस्त्याअभावी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. शैक्षणिक नुकसानी सोबतच गावात आरोग्याचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आला आहे, गावातील रुग्ण अनेकदा दवाखान्यात जाता जाता रस्त्यातच मरण पावल्याचे निदर्शनास येते.अनेकदा या कच्या रस्त्यावर गरोदर स्त्रियांची प्रसूती झाली आहे, इमर्जंसी मध्ये गेल्या वर्षी वृद्ध व्यक्तीचा मृत्यू सुद्धा झाला आहे कारण प्राथमिक आरोग्य केंद्र मारेगाव ला जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने या रस्त्यावर रुग्णवाहिका बेड्यावर जाऊ शकत नाही,तसेच इतर वाहनांमध्ये मारेगावला सुद्धा रुग्ण औषधोपचारासाठी येऊ शकत नाही. 2014 पासून दोन वेळा मा आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांनी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता परंतु रस्ता बांधकाम करण्याची परवानगी वनविभागाने न दिल्यामुळे हा निधी परत गेला होता त्यामुळे गावकर्यांची निराशा झाली होती.मारेगाव तालुक्यातील अतीशय दुर्गम भागात वरूड येथील पारधी बेड्याला संविधान दिनी, नियोजित दौऱ्या दरम्यान मा. नंदकिशोर मालवे सर NSE, TISS Mumbai, तसेच स्थनिक सामाजिक कार्यकर्त्या तातडे मॅडम यांनी गावकऱ्यांना घेऊन वनविभाग ,मारेगाव येथे जाऊन रस्त्याचे बांधकाम करण्याची परवानगी मिळण्याबाबतचे निवेदन मारेगावचे RFO मा.खाडे सर यांना दिले तसेच रेंजर वन अधिकारी यांनी जातीने या प्रकरणात लक्ष द्यावे असे आवाहन सुद्धा गावकर्यांची वतीने करण्यात आले.त्यावर तत्काळ चौकशी केली असता, जंगलातील 250 मीटर रस्ता रहदारीस सोयीस्कर करण्याची हमी RFO यांनी दिली. मा. आमदार बोदकुरवार साहेब यांनी सुद्धा जवळपास 1 km पर्यंत चा रोड बनवून देण्याचे आश्वासन मालवे सर व गावकऱ्यांना दिले आहे त्यामुळे तीन पिढ्या नंतर गावकऱ्यांना एक आशेचा किरण दिसत आहे. त्याबद्दल गावकऱ्यांनी शासनाचे आभार मानले आहे व काम लवकरात लवकर पूर्ण होईल , ही आशा सुद्धा बाळगली आहे.निवेदन देण्यासाठी बेड्यातील सागर पवार, मंगेश पवार तसेच इतर गावकरी या वेळी उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...