खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
*आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)*
यवतमाळ: भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत "माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्ये, पोस्टर निर्मिती इ. अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करण्यात यावे. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा. तसेच या कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संविधान दिनादिवशी सकाळी १० वाजता एकाच वेळी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात यावे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, संविधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश, संविधान आणि शिक्षण इ. विषयावर परिसंवाद, तज्ज्ञांची प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात यावे.
संविधान दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविला जाणारा उपक्रम "माझे संविधान, माझा अभिमान" या उपक्रमांतर्गत आयोजित करावयाचे कार्यक्रम
*गट पहिला - इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी*
*कार्यक्रमाचे नाव*
१. वक्तृत्व
२. रांगोळी
३. चित्रकला
*विषय*
१. भारतीय संविधान
२. माझ्या शाळेतील संविधान दिवस
तपशील
*वक्तृत्व*
दिलेल्या कोणत्याही विषयावर भाषण करून त्याचा ०३ मिनिटांचा व्हिडिओ करून समाजमाध्यमांवर अपलोड करणे.
*रांगोळी / चित्रकला*
दिलेल्या कोणत्याही विषयावर चित्र किंवा रांगोळी काढून चित्राचा किंवा रांगोळीचा फोटो काढून समाजमाध्यमांवर अपलोड करणे.
*कालावधी*
२३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१
*गट दुसरा - इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी*
*कार्यक्रमाचे नाव*
१. निबंध लेखन
२. वक्तृत्व
३. घोषवाक्ये
४. स्वरचित काव्यलेखन
५. पोस्टर निर्मिती
*विषय*
१. संविधान यात्रा / संविधान निर्मितीचा प्रवास
२. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
३. भारतीय संविधान आणि लोकशाही
तपशील
*निबंधलेखन*
दिलेल्या कोणत्याही विषयावर ए- ४ आकाराच्या कागदावर १००० शब्दांपर्यंत निबंध लिहून त्याचा फोटो समाजमाध्यमांवर अपलोड करणे.
*वक्तृत्व*
दिलेल्या कोणत्याही विषयावर भाषण करून त्याचा ०३ मिनिटांचा व्हिडिओ करून समाजमाध्यमांवर अपलोड करणे.
*घोषवाक्ये आणि स्वरचित काव्यलेखन*
ए- ४ आकाराच्या कागदावर स्वरचित कविता किंवा घोषवाक्ये लिहून त्याचा फोटो समाजमाध्यमांवर अपलोड करणे.
*पोस्टर निर्मिती*
दिलेल्या कोणत्याही विषयावर ए-४ आकाराच्या कागदावर पोस्टर काढून त्याचा फोटो समाजमाध्यमांवर अपलोड करणे.
*कालावधी*
२३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१
*गट तिसरा - इयत्ता नववी ते इयत्ता बारावी*
*कार्यक्रमाचे नाव*
१. निबंध लेखन
२. वक्तृत्व
३. पोस्टर निर्मिती
*विषय*
१. भारतीय संविधानिक मूल्ये
२. भारत देशापुढील सद्यस्थितीतील आव्हाने आणि भारतीय संविधान
३. सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे
४. भारत देशाचा सन्मान, माझे भारतीय संविधान
*निबंध लेखन आणि वक्तृत्व*
दिलेल्या कोणत्याही विषयावर ए- ४ |आकाराच्या कागदावर निबंध लिहून त्याचा फोटो आणि वक्तृत्वसाठी ०३ मिनिटांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर अपलोड करणे.
*पोस्टर निर्मिती*
दिलेल्या कोणत्याही विषयावर ए-४ आकाराच्या कागदावर पोस्टर काढून त्याचा फोटो समाजमाध्यमांवर अपलोड करणे.
*कालावधी*
२३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१
*गट चौथा - प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षक*
*कार्यक्रमाचे नाव*
१. फलक लेखन
२. डिजिटल पोस्टर निर्मिती
*विषय*
1. भारतीय संविधान
२. भारतीय संविधान आणि शिक्षण
३. भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या.
४. भारतीय संविधान, माझे विद्यार्थी आणि माझी भूमिका
*फलक लेखन आणि डिजिटल पोस्टर निर्मिती*
दिलेल्या कोणत्याही विषयावर फ़लक लेखन करून त्याचा फोटो समाजमाध्यमांवर अपलोड करणे किंवा डिजिटल पोस्टर समाजमाध्यमांवर अपलोड करणे.
*कालावधी*
२३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१
विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा / कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटांपर्यंतचा सुस्पष्ट व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाजमाध्यमांवर (फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम) अपलोड करावेत, त्यासाठी पुढील हॅशटॅग वापरा.
Photo / Video Facebook, Twitter, Instagram वर अपलोड करावेत.
Constitutionday2021 #Constitutionweek2021 #MyConstitutionMyPride
या HASHTAG (# )चा वापर करून आपल्या व्हिडीओ, फोटो व इतर साहित्याची पोस्ट अपलोड करण्यात यावी. त्याचप्रमाणे ज्या भागात शाळा बंद आहेत, त्या भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑनलाईन माध्यमातुन सहभागी व्हावे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...