ऑनलाईन उपवर-वधू परिचय मेळावा ३ जानेवारी २०२१ ला वणी येथे संपन्न झाला
वणी: धनोजे कुणबी समाज विकास बहु.संस्था द्वार आयोजित धनोजे कुणबी समाज राज्यस्तरीय ऑनलाईन उपवर-वधू परिचय मेळावा ३ जानेवारी २०२१ ला वणी येथे संपन्न झाला. स्थानिक धनोजे कुणबी समाज भवन येथे पार पडलेल्या या मेळाव्याला वणी, वरोरा,भद्रावती, चंद्रपूर,मारेगाव,यवतमाळ वर्धा, नागपूर, यासह अनेक ठिकाणाहून समाज बांधवांनी उपस्तीती दर्शवली होती.
दोन सत्रात पार पडलेल्या या मेळाव्याला उद्घाटक म्हणून भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अशोकराव जीवतोडे होते. मंचावर उपस्थित पाहुण्यांमध्ये वणीचे माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर, वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे , इंदिरा सहकारी सूतगिरणी चे अध्यक्ष सुनील कातकाडे , आयोजन समितीचे अध्यक्ष विकास जेणेकर , धनोजे कुणबी समाज समिती चंद्रपूर चे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते , अलकाताई सातपुते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पाहुण्याच्या उपस्थितीत ‘ऋणानुबंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले . दुसऱ्या सत्रात १५० उपवर-वधू नि आपला परिचय दिला. यावेळी लटारी उरकुडे ,धनोजे कुणबी समाज भवन वणी चे अध्यक्ष अनंत एकरे , मधुकर ढोके ,उत्तमराव मोहितकर ,अशोक गौरकार, प्राचार्य शंकरराव वराटे , प्रा. रविद्र मत्ते, प्रा. नंदकिशोर खिरटकर, धनोजे कुणबी महिला आघाडी अध्यक्ष कविता चटकी , धनोजे कुणबी समाज वणी महिलाध्यक्ष प्रभाताई खाडे यांच्या हस्ते सर्व उपवर उपवधू ना समाजाचे आराध्य दैवत जगन्नाथ महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आल्या. कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करत हा मेळावा सर्वांना पाहता यावा यासाठी आयोजन समितीने DHANOJEKUNBI WANI या युटूब चानल वरून संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले होते.या कार्क्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप बोरकुटे व देवेंद्र खरवडे यांनी तर आभार प्रदर्शन सचिन ढोके व सचिंन पिंपळकर यांनी केले.
या संपूर्ण मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष जगदीश ढोके , आयोजन समिती अध्यक्ष विकास जुनगरी , सचिव प्रदिप बोरकुटे , कोषाध्यक्ष सचिन ढोके यासह संतोष ढूमने , सचिन पिंपळकर प्रा विकास जूनगरि , हरीश पिदुरकर , छगन कुचनकर , देवेंद्र खरवडे , ड़ॉ जगन जुनगरी , संदेश पानघाटे, स्वप्नील गारगाटे, मंगेश रासेकर , प्रवीण भोयर , दिलीप गौरकर , एकनाथ लांबट ,अजय विधाते , विनोद घुंगरूड , शेखर मत्ते , सुरज वैद्य , उमेश ढूमने ,प्रमोद काकडे, विशाल कुंभारे , प्रफुल बल्की , विकास देवतळे , पांडुरंग मोडक, मारोती महातळे , आशिष मिलमिले , शिवराज ढूमने, दिनेश उपरे , प्रफुल जूनगरि , राहुल खारकर , व इतर सर्व धनोजे कुणबी समाज विकास बहु. संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.